AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित-विराट आणि गंभीरमधील वाद शमवण्यासाठी दिग्गज उतरला मैदानात, थेट म्हणणं ऐकण्यास सुरुवात

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. ही मालिका सुरु असताना अचानक विराट-रोहित आणि गंभीर यांच्यात वाद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. असं असताना बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. एका दिग्गजाकडे वाद संपवण्याची जबाबदारी दिली आहे.

रोहित-विराट आणि गंभीरमधील वाद शमवण्यासाठी दिग्गज उतरला मैदानात, थेट म्हणणं ऐकण्यास सुरुवात
रोहित-विराट आणि गंभीरमधील वाद शमवण्यासाठी दिग्गज उतरला मैदानात, थेट म्हणणं ऐकण्यास सुरुवातImage Credit source: PTI
| Updated on: Dec 02, 2025 | 8:23 PM
Share

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या सामन्यात जबरदस्त खेळी केली. असं असताना दुसरीकडे वेगळ्याच वादाला फोडणी मिळाली आहे. रोहित शर्मा-विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद असल्याची चर्चा रंगली आहे. गौतम गंभीरसोबत त्यांचं बोलणंच होत नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम ड्रेसिंग रूममध्ये होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे ही स्थिती सुधारण्यासाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. एक दिग्गज खेळाडूला संघात गोटात धाडलं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने निवडकर्ते प्रज्ञान ओझाला संघासोबत पाठवलं आहे. त्यासाठी रांचीला पाठवलं होतं आणि आता संघासोबत रायपूरला पोहोचला आहे.

भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये होणार आहे. अशा स्थितीत या सामन्यापूर्वी वाद शमवण्याची जबाबदारी प्रज्ञान ओझावर टाकली आहे. रायपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रांची एअरपोर्टवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रज्ञान ओझा आणि विराट कोहली गंभीर चर्चा करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. दोघं बोलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यात चर्चा झाली नव्हती. आता कोहली आणि गंभीर दरम्यानही असंच असल्याचं बोललं जात आहे.

दीड वर्षांनी म्हणजेच 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहेत. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याच्या निर्णयाबाबत चर्चांचा बाजार गरम झाला आहे. रोहित आणि कोहलीच्या भविष्याबाबत सध्या बैठक होताना दिसत नाही. ही बैठक रायपूर वनडे दरम्यान होण्याची अपेक्षा होती . पण आता ही बैठक विशाखापट्टणममधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यानंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गौतम गंभीरची टीम फर्स्ट रणनिती आणि सुपरस्टार कल्चर संपवण्याची निती कोहली-रोहितसारख्या दिग्गज खेळाडूंना खटकत असल्याची बोललं जात आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.