Lord Shardul Thakur : दोन्ही डावात निर्णायक क्षणी अर्धशतकं, मग इंग्लंडचं ‘मूळ’ उखाडत विजयाचा पाया रचला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे

Updated on: Sep 06, 2021 | 10:23 PM

शार्दूल ठाकूर जागतिक क्रिकेटमधला आता सहावा असा बॅटसमन बनला आहे ज्यानं आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकाच कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतक ठोकलंय.

Lord Shardul Thakur : दोन्ही डावात निर्णायक क्षणी अर्धशतकं, मग इंग्लंडचं 'मूळ' उखाडत विजयाचा पाया रचला
शार्दूल ठाकूर

लंडन : लॉर्ड शार्दुल ठाकूर… होय, आता त्याला याच नावाने लोक ओळखू लागलेत. हे नाव त्याला सोशल मीडियाने दिलंय. कारण गेल्या वर्षभरात त्याने जागतिक क्रिकेटमध्ये कामगिरीच तशी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक गाबा कसोटीत निर्णायक क्षणी अर्धशतक फटकावत त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारी केली आणि भारताचं त्या सामन्यातलं आव्हान जिवंत ठेवलं. आज त्या सामन्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. गाबाप्रमाणे आज इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दोन मुंबईकर या विजयाचे हिरो ठरले. पहिला रोहित शर्मा आणि दुसरा शार्दुल ठाकूर. या दोघांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताने ओव्हल कसोटी सामना जिंकला. त्यातही प्रामुख्याने शार्दुल ठाकूरची सध्या देशभर चर्चा आहे. (Shardul Thakur Become hero of India’s Victory against England in Oval test)

शार्दूल ठाकूर जागतिक क्रिकेटमधला आता सहावा असा बॅटसमन बनला आहे ज्यानं आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकाच कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतक ठोकलंय. शार्दूलशिवाय भारताकडून असा रेकॉर्ड फक्त हरभजनसिंग आणि रिद्धीमान साहाच्या नावावर आहे. ह्या दोघांनीही आठव्या नंबरवर खेळताना एकाच कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतकं झळकावली होती. नंबर आठनंतर म्हणजेच नवव्यानंबर असा कारनामा करण्याचा रेकॉर्ड भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. त्यानं एकाच टेस्टच्या दोन्ही डावात अर्धशतक ठोकलं होतं तेही इंग्लंडच्याच विरोधात. कसोटी होती 2014 साली खेळली गेलेली नॉटिंघम.

शार्दूल ठाकूरची जबरदस्त फलंदाजी

ओव्हलवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात शार्दूल दोन सामन्यांनंतर खेळायला उतरला. पहिल्या डावात भारताचा स्कोअर होता 117 धावांवर सहा विकेट. अशा स्थितीत शार्दूल खेळायला उतरला आणि तो भारताला 191 पर्यंत घेऊन गेला. पहिल्या डावात शार्दूलनं 36 बॉल्समध्ये शानदार 57 रन्स ठोकल्या. यात त्यानं 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

एवढच नाही तर दुसऱ्या डावातही शार्दूलनं कमाल केली. विशेष म्हणजे पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात शार्दूलनं मोठी जबाबदारी निभावली. दुसऱ्या डावात भारतानं 312 रन्सवर सहा विकेट गमावल्या त्यावेळेस शार्दूल मैदानात उतरला. टीम इंडियाकडे 211 धावांची आघाडी होती. त्यानंतर शार्दूलनं ऋषभ पंतसोबत 100 धावांची महत्वाची भागीदारी करत टीम इंडियाची आघाडी 300 पार पोहोचवली. शार्दूलच्याच खेळाच्या जोरावर टीम इंडिया इंग्लंडसमोर 368 धावाचं आव्हान उभं करु शकली. शार्दूलने दुसऱ्या डावात 72 चेंडूत 60 धावांची महत्वाची खेळी खेळली.

फलंदाजीत शार्दुल चमकलाच, त्यासोबत त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्याला केवळ एकच बळी मिळवता आला होता. दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरु केली होती. सलामीवीर हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी सलामीसाठी शतकी (100) भागीदारी केली. परंतु लार्ड शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने बर्न्सचा 50 धावांवर असताना काटा काढला. त्यानंतर या मालिकेत सातत्याने भारतीय गोलंदाजांची पिसं काढणारा कर्णधार जो रुट मात्र या डावातही खेळपट्टीला चिकटला होता. मात्र पुन्हा एकदा लॉर्ड शार्दुलने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याने रुटला त्रिफळाचित करत भारताचा विजय पक्का केला.

इतर बातम्या

IND vs ENG : भारतावर मोठं संकट, चौथी कसोटी सुरु असतानाच दिग्गज खेळाडू सामन्याबाहेर, पाचव्या कसोटीपूर्वी संघ अडचणीत

Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?

IND vs ENG : पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडचा दिग्गज परतण्याची शक्यता, इंग्लंड संघ व्यवस्थापन मात्र चिंतेत

(Shardul Thakur Become hero of India’s Victory against England in Oval test)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI