आधी लोकल, आता कारने 10 तासात 700 किमी प्रवास, शार्दूल ठाकूरच्या जिद्दीला सलाम!

बीसीसीआयने शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) रिलीज केल्यानंतर तो देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी रवाना झाला.

आधी लोकल, आता कारने 10 तासात 700 किमी प्रवास, शार्दूल ठाकूरच्या जिद्दीला सलाम!
जेव्हा शार्दूल ठाकूरने मुंबई लोकलमधून प्रवास केला होता..
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 4:18 PM

अहमदाबाद : ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजयात, मोलाचा वाटा उचलणाऱ्या पालघरच्या शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्थान मिळालेलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत उमेश यादवला दुखापत झाल्यामुळे शार्दूल ठाकूरला संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने संधीचं सोनं केलं. मात्र इंग्लंडविरुद्ध (India vs England 3rd test match, ) त्याला संधीच मिळाली नाही. बीसीसीआयने शार्दूल ठाकूरला रिलीज केल्यानंतर तो देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी रवाना झाला. (Shardul Thakur travelled for 10 hours to play the Vijay Hazare Trophy)

महत्त्वाचं म्हणजे मुंबई संघाकडून खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी 10 तास रस्तेमार्गाने प्रवास केला. शार्दूल ठाकूर अहमदाबादवरुन राजस्थानला कारने रवाना झाला. त्याने तब्बल 700 किमीचा प्रवास केला.

BCCI च्या माहितीनुसार, उमेश यादवने (Umesh Yadav) ने रविवारी अहमदाबादमध्ये फिटनेस टेस्ट पास केली. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत दोन कसोटी सामन्यांसाठी संधी देण्यात आली. त्यामुळे शार्दूल ठाकूरला विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी रिलीज करण्यात आलं.

शार्दूल ठाकूर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळतो. मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीपूर्वी म्हणजे सोमवारी 22 तारखेलाच त्याला रिलीज करण्यात आलं. मुंबईचा संघ सध्या जयपूरमध्ये आहे. बीसीसीआयने त्याला रिलीज केल्याने, तो तातडीने जयपूरला रवाना झाला. शार्दूलचं क्रिकेटप्रेम सर्वांना परिचीत आहे. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

क्वारंटाईन टाळण्यासाठी 700 किमी रस्तेमार्गे प्रवास 

दरम्यान, शार्दूल ठाकूर अहमदाबादवरुन जयपूरपर्यंत 700 किमी रस्ते मार्गाने गेला. त्यासाठी त्याला जवळपास 10 तास लागले. जर त्याने हा प्रवास विमानाने केला असता तर तो केवळ 80 मिनिटात जयपूरला पोहोचला असता. मात्र तिथे त्याला तीन दिवस क्वारंटाईन राहावं लागलं असतं. त्यामुळेच शार्दूल ठाकूर कारने जयपूरला गेला.

टाईम्स ऑफ इंडियाला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शार्दूल ठाकूर 22 तारखेला पहाटे पाच वाजता कारने जयपूरकडे रवाना झाला. शार्दूलचा हा निर्णय पाहून आम्हीही अवाक झाला. जर तो फ्लाईटने आला असता, तर त्याला क्वारंटाईन व्हावं लागलं असतं, मात्र त्याचं क्रिकेटवर किती प्रेम आहे हे त्याच्या कृतीतून दिसतं”

दरम्यान, विजय हजारो ट्रॉफीमध्ये 25 फेब्रुवारीला मुंबईचा सामना पुद्दुचेरीविरोधात होत आहे. मुंबई संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. या शिवाय या संघात पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, धवल कुलकर्णी, अखिल हेरवाडकर, सरफराज खान यासारखे तगडे खेळाडू आहेत.

… तेव्हा शार्दूल ठाकूरचा मुंबई लोकलने प्रवास

मार्च 2018 मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करुन मायदेशी परतली होती. त्यावेळी शार्दूल ठाकूर हा भारताच्या वन डे आणि टी 20 संघात होता. शार्दूल ठाकूरने ही मालिका गाजवली होती. शार्दूलला एक वनडे आणि दोन टी 20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. वन डे सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. तर दोन टी 20 सामन्यात त्याने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या होत्या.

आफ्रिकेतील धडाकेबाज कामगिरीनंतर शार्दूल ठाकूर टीम इंडियासह मायदेशी परतला. शार्दूल मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर, तिथून थेट अंधेरी रेल्वे स्टेशनवर गेला. अंधेरी स्टेशनवर पालघरचं तिकीट काढून तो लोकल ट्रेनने घरी गेला. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या BCCI चा खेळाडू लोकल रेल्वेने घरी गेल्यानंतर, त्याची जगभरात चर्चा होती. कोणताही बडेजाव न दाखवता शार्दूल ठाकूरच्या साधेपणावर कौतुकांचा वर्षाव झाला होता.

पालघर ते चर्चगेट, शार्दूलचा लोकल प्रवास

शार्दूल ठाकूर हा पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील माहिम-केळवे या गावचा आहे. क्रिकेट हे शार्दूल ठाकूरसाठी जीव की प्राण. त्यामुळेच पालघरच्या या पठ्ठ्याने प्रचंड कष्टाने टीम इंडियाचं दार ठोठावलं. नुकतं दार ठोठावलंच नाही तर जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा धडाकेबाज कामगिरीकरुन माहिम केळवे गावाची दखल ‘गुगल मॅप’लाही घ्यायला लावली. क्रिकेटच्या सरावासाठी शार्दूल ठाकूर दररोज पालघर ते चर्चगेट असा जवळपास अडीच तीन तासांचा प्रवास करायचा.

(Shardul Thakur travelled for 10 hours to play the Vijay Hazare Trophy)

संबंधित बातम्या  

आधी मुंबई लोकलमधून पालघरला परतला, आता शार्दूल ठाकूर मुंबई विमानतळावरुन कुठे गेला?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.