AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ना मैं खेलूंगा, ना तुम्हे खेलने दूँगा’, शिखरला टी ट्वेन्टीमध्ये घरी पाठवणाऱ्या खेळाडूची बॅट रुसली, आता प्लेईंग 11 मध्ये खेळण्यावर शंका!

आयपीएलमधील राहुलच्या खराब कामगिरीनंतर त्याला टी -20 वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत खुद्द विराट कोहली सलामीला उतरु शकतो.

'ना मैं खेलूंगा, ना तुम्हे खेलने दूँगा', शिखरला टी ट्वेन्टीमध्ये घरी पाठवणाऱ्या खेळाडूची बॅट रुसली, आता प्लेईंग 11 मध्ये खेळण्यावर शंका!
भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 1:12 PM
Share

नवी दिल्ली : टी ट्वेन्टी वर्ल्ड कपची सुरुवात येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यंदाच्या टी ट्वेन्टीमध्ये भारताला विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानलं जातंय. टी ट्वेन्टीसाठी भारताचा क्रिकेट संघ अगोदरच जाहीर झालाय. यात निवड समितीने शिखर धवनला मोठा धक्का दिला. शिखरच्या जागी निवड समितीने के एल राहुलला संधी दिली. पण त्याच के एल राहुलची बॅट आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यांदरम्यान रुसलीय. त्याची बॅट म्हणावी अशी बोलत नाहीय. त्यामुळे वर्ल्ड कपमधील त्याच्या प्लेईंग 11 वरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

टी 20 विश्वचषकासाठी निवड समितीने शिखर धवनच्या जागी केएल राहुलला संधी देणे अधिक योग्य समजलं, परंतु आयपीएलमध्ये राहुलच्या बॅटमधून रन्सची बरसात होताना दिसून येत नाहीय. आयपीएल 2021 मध्ये नुकत्याच खेळलेल्या शेवटच्या 2 सामन्यांमध्ये राहुल फ्लॉप ठरलाय. गेल्या 2 सामन्यांमध्ये राहुलच्या बॅटमधून 21-21 धावा आल्या आहेत. राहुलच्या खराब कामगिरीनंतर त्याला टी -20 वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत खुद्द विराट कोहली सलामीला उतरु शकतो.

शिखर धवनच्या बॅटमधून आयसीसी स्पर्धांमध्ये धावांची बरसात

भारताचा संतुलित संघ आहे. शिखर ज्या फॉर्ममध्ये होता, तो पाहता त्याला संघात घ्यायला हवं होतं. कारण शिखर हा मोठ्या मॅचचा खेळाडू आहे. मोठ्या मॅचमध्ये त्याची कामगिरी सरस राहिलीय. आयसीसीच्या स्पर्ध्यांध्ये तो लाजवाब खेळतो. आयपीएलमध्येही शिखरने आपल्या बॅटची जादू दाखवलीय. त्याने सध्याच्या 14 व्या आयपीएल मोसमात 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. शिखर एवढे रन्स तर ना रोहित शर्माने ठोकलेत ना विराट कोहलीने…!

लागोपाठ 6 मोसमात 400 पेक्षा अधिक रन्स

शिखर धवनने आयपीएलच्या 2016 ते 2021 पर्यंतच्या लागोपाठ मोसमात 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शिखरने 2011, 2012, 2016, 2017, 2018, 2019, 2020 आणि 2021 आयपीएलमध्ये 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. म्हणजेच धवनने एकूण 8 वेळा 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक 400 प्लस स्कोअरचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने 9 वेळा 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये पुन्हा एकदा शिखर धवनने आपल्या बॅटची जादू दाखवली आहे.

रोहित शिखरची विस्फोटक जोडी

अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन बराच काळ भारतीय संघात रोहित शर्मासोबत सलामीची जबाबदारी उत्कृष्ठपणे बजावत आहे. पण शिखरला टी ट्वेन्टी विश्वचषक संघात स्थान देण्यात आलेले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिखर धवनला राखीव खेळाडूंमध्येही स्थान देणं सिलेक्टर्सनी योग्य मानलं नाही. झाल्या प्रकाराने गब्बरचे चाहते नाराज आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यांत शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये होता. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत धवनला संघाचा कर्णधार म्हणून पाठवण्यात आलं होतं.

(Shikhar Dhawan was dropped from the T20 squad due to KL Rahul)

हे ही वाचा :

MI vs PBKS : मुंबईच्या पंजाबवरील विजयानंतर MI चे चाहतेच नाही, तर संपूर्ण भारतीय क्रिकेट फॅन्स खुश, ‘हे’ आहे कारण

DC vs KKR: केकेआरच्या व्यंकटेशची अष्टपैलू खेळी, आयपीएलमधील खास रेकॉर्डचा मानकरी

IPL 2021: कुंग-फू पंड्याच्या धमाकेदार खेळीची झलक, मुंबईचा 6 विकेट्सनी पंजाबवर विजय!

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.