टीम इंडियाच्या या खेळाडूला मारला होता लकवा, अखेर धक्कादायक सत्य आलं बाहेर
टीम इंडियाचे खेळाडू मैदानात खेळताना फिट अँड फाईन दिसतात. मात्र त्यांनाही अनेक दुखापतींना सामोरं जावं लागतं. अनेकदा आपल्याला माहिती देखील नसतं. पण श्रेयस अय्यर एका मुलाखतीत धक्कादायक वास्तव सांगितलं आहे. नेमकं काय झालं होतं ते जाणून घेऊयात

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर श्रेयस अय्यर टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. इंग्लंड कसोटी मालिकेनंतर आशिया कप स्पर्धेतूनही डावलण्यात आलं. आता भारत अ संघाची धुरा त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढलं आहे. शॉर्ट बॉल खेळण्यात येणारी अडचणही दूर केली. पण असं करत असताना त्याने काय वेदना सहन केल्या, याबाबत आता कुठे जात खरं सांगितलं आहे. श्रेयस अय्यरने सांगितलं की, 2023 मध्ये अशी दुखापत झाली की त्यामुळे एक पाय काम करणं बंद झाला होता. श्रेयस अय्यरने सांगितलं की, त्याच्या एका पायाला लकवा मारला होता. श्रेयस अय्यरने GQ India शी बोलताना हे दु:ख सांगितलं.
2023 मध्ये श्रेयस अय्यरला पाठीची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने पंतला कर्णधारपद सोपवले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही खेळला नाही. श्रेयस अय्यरने सांगितलं की, ‘मी कोणत्या दुखापतीतून गेलो आहे हे कोणीही समजू शकत नाही. माझा एक पाय पूर्णपणे चालणं बंद झाला होता. माझ्या एका पायाला लकवा मारला होता. माझ्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली होती. माझ्या कंबरेपर्यंत रॉड घालण्यात आला होता. तो अनुभव खूपच वेदनादायक आणि भीतीदायक होता. मला खूपच जास्त वेदना होत होत्या. माझ्या कमरेपासून टाचांपर्यंत खूपच वेदना होत होत्या. तो खूपच भयानक अनुभव होता.’
श्रेयस अय्यरने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. खेळाडू अपयशी ठरल्यावर त्यांच्यावर टीका करण्याऱ्यांची खरडपट्टी काढली. ‘लोकं अनेकदा खेळाडूंना रोबोट मानतात. त्यांना वाटतं की प्रत्येक सामन्यात कामगिरी करेल. पण त्यांच्या मागे काय सुरु असतं हे माहिती नसते.’ श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळेल की नाही अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र भारत अ संघाचे कर्णधारपद मिळाल्याने तसे संकेत मिळत आहेत. करुण नायरच्या जागी कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कारण करूण नायर इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरला होता.
