SL vs AUS Odi Series : कसोटीनंतर आता एकदिवसीय मालिका, मोहम्मद शिराजचा समावेश, पहिला सामना केव्हा?
Sri Lanka vs Australia Odi Series : ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश करत धमाकेदार विजय मिळवला. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने श्रीलंकेचा त्यांच्याच घरात धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने कांगारुंना 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने पराभूत केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 या साखळीचा अप्रतिम शेवट केला. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात या मालिकेत एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहे. स्टीव्हन स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. चरिथ असलंका याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा आहे.
ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची मालिका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियासाठी फार महत्त्वाची मालिका असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याच्यासह एकूण 3 खेळाडू दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडले आहेत. तर एकाने संघात निवड होऊनही एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका फार निर्णायक अशी ठरणार आहे.
श्रीलंका चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरली नाही. श्रीलंकेला घरातल्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून पलटवार करण्याचा प्रयत्न श्रीलंकेचा असणार आहे. त्यामुळे श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीआधी लय खराब करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता यात श्रीलंकेला किती यश येतं? हे सामन्यानंतर स्पष्ट होईलच.
दरम्यान या मालिकेतील सलामीचा सामना हा बुधवारी 12 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा शुक्रवारी 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. दोन्ही सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमम्ये खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका संघ : चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, मोहम्मद शिराज, एशान मलिंगा, मोहम्मद तीक्षणा, जेफ्री वांडरसे आणि निशान मधुष्का
ऑस्ट्रेलिया संघ : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, कूपर कॉनोली, शॉन ॲबॉट, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्पेन्सर जॉन्सन, ॲरॉन हार्डी, मार्नस लॅबुशेन, ग्लेन सांगा मॅक्सवेल, ॲडम शोव्हर्ट आणि ॲडम मॅक्सवेल.
