स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, सहा वर्षानंतर दिग्गज फलंदाजांना मागे टाकत मिळवला मान
भारतीय महिला क्रिकेटचा नावलौकीक दिवसेंदिवस वाढत आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, जवळपास सहा वर्षानंतर स्मृती मंधानाने नंबर एकचा मुकूट मिळवला आहे. दक्षिण अफ्रिकेच्या लॉरा वुलफार्टला मागे टाकत हा मान मिळवला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत स्मृती मंधानाने पुन्हा उंची गाठली आहे. मागच्या सहा वर्षांपासून अव्वल स्थानासाठी झुंज सुरु होती. अखेर तिला सहा वर्षानंतर मानाचं स्थान मिळालं आहे. आयसीसीने महिला क्रिकेटपटूंची नवी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यात स्मृती मंधानाने वनडे क्रिकेटमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. इंग्लंडविरुद्ध या महिन्याच्या शेवटी होणार्या व्हाइट बॉल मालिकेपूर्वी मंधानाला गूड न्यूज मिळाली आहे. यामुळे स्मृती मंधानाचं मनोबल आणखी वाढणार आहे. दक्षिण अफ्रिकेच्या लॉरा वुलफार्टला मागे टाकत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. स्मृती मंधाना सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. नव्या क्रमवारी लॉरा वुलवार्टला 19 गुणांचा फटका बसला आहे. यामुळे स्मृती मंधाना 727 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. तर वुलवार्टची थेट पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर दुसऱ्या स्थाना इंग्लंडची नॅट स्कायवर असून तिच्या खात्यात 719 गुण आहेत.
स्मृती मंधानाने या श्रीलंकेत खेळलेल्या ट्राय सीरिजच्या अंतिम फेरीत शतकी खेळी केली होती. वनडे क्रिकेट कारकीर्दीतील 11वं शतक ठोकलं होतं. या मालिकेत स्मृती मंधानाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केली होता. या खेळीचा स्मृती मंधानाला क्रमवारीत फायदा झाला. स्मृती मंधाना 102 वनडे सामने खेळली असून त्यने 5095 धावा केल्या आहेत. यात 11 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये 148 सामन्यात 30 अर्धशतकं ठोकली आहेत. दुसरीकडे, लॉरा वॉलवार्टची कामगिरी या कालावधीत सुमार राहिली. दुसरीकडे, स्मृती मंधाना वगळता एकही महिला क्रिकेटपटू टॉप 10 मध्ये नाही. पण टॉप 20 मध्ये दोन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यात 14 व्या क्रमांकावर जेमिमा रॉड्रिग्स आणि 15 स्थानावर हरमनप्रीत कौर आहे.
दुसरीकडे, स्मृती मंधाना टी20 क्रिकेटमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या महिन्याच्या शेवटी भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. पहिला सामना 28 जून, दुसरा सामना 1 जुलै, तिसरा सामना 4 जुलै, चौथा सामना 9 जुलै आणि पाचवा सामना 12 जुलै रोजी आहे. तर वनडे मालिका 16 जुलैपासून सुरु होणार आहे.
