मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर स्मृती मंधानाला दुखापत, भीतीमुळे सोडलं होतं मैदान
स्मृती मंधाना वनडे वर्ल्डकप स्पर्धेत फॉर्मच्या शोधात आहे. सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात काही खास करू शकली नाही. असं असताना एक किस्सा समोर आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने स्मृती मंधानाला जखमी केलं होतं. नक्की काय झालं होतं ते जाणून घ्या

मोहम्मद शमी आणि स्मृती मंधाना हे भारतीय क्रिकेट जगातील सर्वात मोठी नावं आहे. मेन्स क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भल्याभल्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली आहे. दुसरीकडे, स्मृती मंधाना महिला क्रिकेटमध्ये नावाजलेलं नाव आहे. या दोघांचा एकमेकांशी सामना झाला होता. तेव्हा नेमकं काय झालं होतं हे खुद्द मोहम्मद शमीने सांगितलं आहे. महिला क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेल्या स्मृती मंधाना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचा सामना करताना जखमी झाली होती. मोहम्मद शमीने हा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. शमीने सांगितलं की, छोटी रनअप घेत स्मृती मंधानाला तीन चेंडू टाकले. त्यात ती दुखापतग्रस्त जाली. त्यानंतर मोहम्मद शमी मैदान सोडून निघून गेला. स्मृती मंधानाला जखमी केल्याच्या प्रश्नावर मोहम्मद शमीने हा खुलासा केला.
मोहम्मद शमीने सांगितलं की, ‘2015 वर्ल्डकपनंतर माझ्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. वुमन्स टीम सरावासाठी आली होती. फिजिओने सांगितल की शॉर्ट रनअपने 4-5 षटकं टाकायची आहेत. मी त्याला सांगितलं की मी टाकू शकते. पण मी एकटा गोलंदाजी करताना कंटाळून जातो. मला फलंदाज समोर हवा आहे. त्याला वाटलं की मी 4-6 पावलांनी तितक्या वेगात टाकणार नाही. तसं पण मी एका पायाने लंगडत होतो. आम्ही मुलींना विचारलं की 4-5 पावलांनी चेंडू टाकला तर तुम्ही खेळू शकता का? तेव्हा त्यांनी होकार दिला.’
मोहम्मद शमीने पुढे सांगितलं की, ‘त्यांनी हा विचार केला नाही की चेंडू स्विंगही होऊ शकतो. त्यांना फक्त वेगाचा अंदाज होता. पहिले दोन चेंडू मी त्यांना आउट स्विंग टाकली आणि दोन्ही वेळेस चुकली. त्यानंतर मी इन स्विंग टाकला आणि चेंडू तिच्या इनर थायवर लागला. मी त्यानंतर तेथून निघून गेलो.’ मोहम्मद शमी भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला फार काही संधी मिळाली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला आणि 9 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर आयपीएल स्पर्धेत हवी तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातून डावललं गेलं.
“पहिल्या दोन चेंडूंचा सामना करताना ते हुकले. कराण कारण मला वेगाची सवय नव्हती. तिसऱ्या चेंडूवर, त्याच्या इन स्विंगने माझ्या मांडीच्या आतील भागात लागला. तेव्हा तिथे ते काळे, निळे पडले होते आणि 10 दिवस सूज होती.” असं यापूर्वी स्मृती मंधानाने सांगितलं होतं.
