AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs SA: बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेची घोषणा

Bangladesh vs South Africa Test Series: दक्षिण आफ्रिका बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

BAN vs SA: बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेची घोषणा
south africa test cricket teamImage Credit source: ProteasMenCSA X Account
| Updated on: Oct 03, 2024 | 12:54 AM
Share

बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. टेम्बा बावुमा या दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेसाठी बांगलादेश दौरा करणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत 3 स्पिनर्सचा समावेश केला आहे. या तिघांमध्ये केशव महाराज, डेन पीट आणि सेनुरन मुथुसामी याचा समावेश आहे. हा फिरकी गोलंदाज मार्च 2023 पासून कसोटी संघातून बाहेर होता.

सेनुरन मुथुसामी याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचं एकूण 3 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मुथुसामीने 2019 मध्ये टीम इंडिया विरुद्ध पदार्पण केलं होतं. तर अखेरचा सामना हा 2023 साली विंडिज विरुद्ध खेळला होता. मुथुसामीने 3 सामन्यांमध्ये 2 विकेट्स घेण्यासह 105 धावा केल्या आहेत. तसेच मुथुसामीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 30.41 च्या सरासरीने 5 हजारच्या आसपास धावा आणि 247 विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने या मालिकेसाठी 4 वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. या चौघांमध्ये कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर, डेन पेटरसन आणि वियाम मुल्डरचा समावेश आहे. तर लुंगी एन्गिडी आणि मिगेल प्रीटोरियस या दोघांना संधी मिळाली नाही. उभयसंघातील पहिला सामना हा 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ढाका येथे आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरा सामना हा 2 ते 6 नोव्हेंबर दरम्यान चट्टोग्राम येथे होणार आहे. या दौऱ्याआधी बांगलादेशमध्ये भीषण अराजकता होती. त्यामुळे या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या सुरक्षा टीमने योग्य चौकशी केल्यानंतर दौऱ्यासाठी हिरवा कंदील दिला

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

  • पहिला सामना, सोमवार 21 ते शुक्रवार 25 ऑक्टोबर , शेरे बांगला क्रिकेट स्टेडियम, ढाका
  • दुसरा सामना, मंगळवार 29 ऑक्टोबर ते शनिवार 2 नोव्हेंबर, झहुर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राम

बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टन), डेव्हिड बेडिंगहॅम, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, केशव महाराज, एडन मार्करम, विआन मुल्डर, सेनुरान मुथुसामी, डेन पॅटरसन, डेन पिएड, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन आणि काइल व्हर.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.