AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India T20 World Cup : मुंबईकरांना भेटणार टीम इंडिया, वेळ ठरली…सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर येणाऱ्या टीम इंडियाच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. निमलष्करी दलाचीही कारवाई सुरु झाली आहे. तर, मुंबईतही पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. दुपारी 4 वाजता टीम इंडिया दिल्लीहून मुंबईला रवाना होणार आहे.

Team India T20 World Cup : मुंबईकरांना भेटणार टीम इंडिया, वेळ ठरली...सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त
team india t20 world cupImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 03, 2024 | 11:24 PM
Share

T20 वर्ल्ड कप 2024 जिंकणारा भारतीय संघ एअर इंडियाच्या चार्टर्ड फ्लाइटने गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल होणार आहे. टीम इंडिया बार्बाडोसहून दिल्लीकडे रवाना झाली. टीम इंडियाच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मुंबईला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू दिल्लीच्या हॉटेल मौर्यामध्ये विश्रांती घेणार आहेत. हॉटेल मौर्याचा परिसरही पोलिसांनी वेढला असून टीम इंडियाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्रत्येक कोपऱ्यावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. तसेच, निमलष्करी दलही सुरक्षेसाठी तयार आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाला IGI विमानतळावरून मौर्या हॉटेलपर्यंत सुरक्षितपणे नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टीम इंडिया विमानतळावरून मौर्या हॉटेलसाठी निघेल तेव्हा सशस्त्र पोलिस कर्मचारी तेथे उपस्थित असतील. एक एस्कॉर्ट वाहन त्यांच्यासोबत असेल. भारतीय खेळाडू ज्या विमानात आहेत विमान गुरुवारी सकाळी 6 वाजता दिल्लीत उतरणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

विमानतळ ते हॉटेल या मार्गावर प्रत्येक पायरीवर निमलष्करी दल तैनात केले जाणार आहे. निमलष्करी दलाच्या दोन कंपन्या हॉटेलकडे जाणारा रस्ता आणि हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरावरही लक्ष ठेवणार आहेत. भारतीय संघाला भेटण्यासाठी विमानतळ आणि हॉटेलमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी टीम इंडिया जाईल. तिथे टीम इंडिया पंतप्रधान यांच्यासोबत नाश्ता करतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता टीम इंडिया दिल्लीहून मुंबईला रवाना होणार आहे. दरम्यान, कप्तान रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे सचिव जय यांनी चाहत्यांना 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता मरीन ड्राइव्हवर पोहोचण्याची विनंती केली आहे. येथे टीम इंडियाची विजय परेड होणार आहे.

T20 विश्वचषक अंतिम सामन्‍यानंतर रविवारी बार्बाडोसमध्‍ये अचानक वादळ धडकले होते. त्यामुळे येथे संचारबंदी लागू करण्‍यात आल्याने भारतीय क्रिकेट संघ तीन दिवस बार्बाडोसमध्ये अडकून पडला होता. बीसीसीआयने विशेष चार्टर्ड फ्लाइट पाठवून टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याची व्यवस्था केली. अखेर, बुधवारी बार्बाडोसहून विशेष चार्टर्ड विमानाने टीम इंडिया भारताकडे रवाना झाली.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप