SRH vs MI : रोहित शर्माची कडक खेळी, मुंबईचा सलग चौथा विजय, हैदराबादला 7 विकेट्सने लोळवलं
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Match Result : मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादवर मात करत आयपीएल 2025 मध्ये सलग चौथा आणि एकूण पाचवा विजय मिळवला आहे. रोहित शर्मा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर धमाकेदार आणि एकतर्फी विजय मिळवला आहे. मुंबईने हैदराबादवर 7 विकेट्सने मात केली आहे. हैदराबादने मुंबईला विजयासाठी 144 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 26 बॉलआधी पूर्ण केलं. मुंबईने 15.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. रोहित शर्मा हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. रोहित शर्मा याने मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली. मुंबईने यासह या हंगामातील एकूण पाचवा तर सलग चौथा विजय साकारला. तर हैदराबादचा हा एकूण सहावा पराभव ठरला.
मुंबईची बॅटिंग
रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा मुंबईला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरले. रायन 11 धावा करुन आऊट झाला. मुंबईने 13 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानतंर रोहित आणि विल जॅक्स या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 64 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान रोहित आणि विल या दोघांनी संयमी खेळी केली. मात्र ही जोडी झीशान अन्सारी याने फोडली. झीशानने विल याला अभिनव मनोहर याच्या हाती कॅच आऊट केलं. विलने 19 चेंडूत 22 धावा जोडल्या.
त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. रोहितने सूर्यासह मुंबईच्या विजयाचा मार्ग आणखी मोकळा केला. मुंबईच्या या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहित आणि सूर्या या दोघांनी 53 धावा जोडल्या. रोहितला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. मात्र रोहितने त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. रोहितने 46 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 70 धावा केल्या.
त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने मुंबईला विजयापर्यंत पोहचवलं. तिलकने नाबाद 2 धावा केल्या. तर सूर्याने 19 बॉलमध्ये 210.53 च्या स्ट्राईक रेटने 5 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 40 रन्स केल्या. मुंबईने अशाप्रकारे सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध या मोसमात सलग दुसरा विजय मिळवला.
मुंबईचा विजयी पंच, हैदराबादला 7 विकेट्सने लोळवलं
For his match-winning spell, Trent Boult is tonight’s Player of the Match 👏
Scorecard ▶ https://t.co/nZaVdtwDtv #TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/EaKIAuVQMG
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2025
दरम्यान मुंबई इंडियन्सने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 5 मध्ये धडक दिली. मुंबई एका विजयासह थेट तिसऱ्या स्थानी विराजमान झाली आहे. त्यामुळे आता पॉइंट्स टेबलमधील चुरस आणखी वाढली आहे.
