AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs BAN : श्रीलंका बांग्लादेश कसोटी सामन्याची ड्रॉकडे वाटचाल, अशी असेल WTC 2027 विजयी टक्केवारी!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात श्रीलंका बांग्लादेश कसोटी सामन्यापासून झाली आहे. या सामन्याच्या चार दिवसांचा खेळ संपला असून ड्रॉकडे वाटचाल सुरु झाली आहे. शेवटच्या दिवशी एखादा चमत्कार झाला तरच निकाल लागू शकतो. अशात विजयी टक्केवारीवर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

SL vs BAN : श्रीलंका बांग्लादेश कसोटी सामन्याची ड्रॉकडे वाटचाल, अशी असेल WTC 2027 विजयी टक्केवारी!
श्रीलंका कसोटी टीम Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Jun 20, 2025 | 6:21 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वातील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्या सुरु आहे. या सामन्यात सुरुवातीला बांगलादेशचं पारडं जड दिसत होतं. पण श्रीलंकेने तिसऱ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केलं. बांगलादेशने पहिल्या दिवशी दोन दिवसांचा खेळ केला. यावेळी बांगलादेशने सर्व गडी बाद 495 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने सर्वबाद 485 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात 10 धावांची आघाडी बांगलादेशकडे आली. यापुढे खेळताना बांगलादेशने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 3 गडी गमवून 177 धावा केल्या. चौथ्या दिवस अखेर बांगलादेशकडे 187 धावांची आघाडी आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी श्रीलंकेसमोर मोठं आव्हान ठेवून 10 विकेट काढणं कठीण वाटत आहे. त्यामुळे पहिला कसोटी सामन्याची ड्रॉकडे वाटचाल सुरु झाली आहे. हा सामना ड्रॉ किंवा एखाद्या संघाने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर कसा फरक पडेल ते

श्रीलंका आणि बांग्लादेश सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 4 पॉइंट मिळतील. तसेच दोन्ही संघांची विजयी टक्केवारी ही 33.33 इतकी असेल. यात स्लो ओव्हर रेटसाठी पेनल्टी ठोठावली गेली तर त्याचा थेट प्रभाव विजयी टक्केवारीवर होईल. पेनल्टी 1 असेल तर विजयी टक्केवारी थेट 25 टक्क्यांवर, 2 असेल तर 16.67 टक्क्यांवर, 3 असेल तर 8.33 टक्क्यावर येईल.

श्रीलंका आणि बांग्लादेश यापैकी एका संघाने सामना जिंकला तर विजयी टक्केवारीत मोठा फरक दिसून येईल. उदाहरणार्थ हा सामना जर श्रीलंकेने जिंकला तर 12 गुण मिळतील आणि विजयी टक्केवारी ही 100 टक्के असेल. तर बांगलादेशची विजयी टक्केवारी ही शून्य असेल. जर यात स्लो ओव्हर रेट पेनल्टी असेल तर विजयी टक्केवारीवर फरक दिसून येईल. प्रत्येक एक निगेटीव्ह मार्कसाठी 8.33 टक्के कापले जातील.

त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात काय निकाल लागतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण विजयी टक्केवारीच अंतिम फेरीचं गणित ठरतं. त्यामुळे विजयासोबत पेनल्टी लागू नये याची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे. मागच्या पर्वात पेनल्टीचा सर्वाधिक फटका इंग्लंड संघाला बसला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.