AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचव्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाने टाकला डाव, कर्णधार बदलून देणार क्रीडाप्रेमींना धक्का!

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अजूनही खेळायचा बाकी आहे. मात्र या सामन्यापूर्वीत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहे. एकीकडे रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पाचव्या कसोटीपूर्वी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

पाचव्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाने टाकला डाव, कर्णधार बदलून देणार क्रीडाप्रेमींना धक्का!
| Updated on: Jan 02, 2025 | 2:53 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रस्सीखेंच आहे. एका बाजूने दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या संघासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस आहे. खरं तर पाचव्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर हे चित्र स्पष्ट होईल. पण टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाला श्रीलंका दौऱ्यात आणखी जोर लाववा लागेल. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जर सिडनी कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर या मालिकेत एक सामना जिंकणं भाग आहे. अन्यथा टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत संधी मिळेल. असं असताना ऑस्ट्रेलियाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. पॅट कमिन्स ऐवजी स्टीव्हन स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्याची तयारी केली आहे. प्रसिद्ध सँडपेपर घटनेपूर्वी स्मिथने ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आहे.

पॅट कमिन्सला बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेनंतर आराम देण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जायचं आहे. या संघाचं नेतृत्व पॅट कमिन्सच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी पॅट कमिन्स फिट अँड फाईन असणं गरजेचं आहे. यासाठी श्रीलंका दौऱ्यात पॅट कमिन्सला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी ही मालिका खेळणार नसल्याचं पुढे आलं आहे. ही मालिका 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान आहे. कमिन्सला नुकताच मातृशोक झाला होता. तेव्हापासून तो कुटुंबासोबत वेळ घालवण्याबाबत कायम बोलत आला आहे. डेली टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत पॅट कमिन्सने सांगितलं की, ‘तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे.मी मागच्या काही दिवसात बरंच काही गमावलं आहे. पण यावेळेस मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितो.’ दुसरीकडे, निवडकर्त्याने पॅट कमिन्सच्या निर्णयाचा आदर राखत स्मिथकडे कर्णधारपद सोपण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.