Sunil Gavaskar : …तरच फॉममध्ये येशील, सुनील गावसकरांचा विराट कोहलीला अनोखा सल्ला..!

विराट कोहली(Virat Kohli)ची बॅट 2 वर्षांपासून तळपली नाही. विराटच्या या खराब फॉर्मबाबत माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय कसोटी कर्णधाराला अफलातून सल्ला दिलाय.

Sunil Gavaskar : ...तरच फॉममध्ये येशील, सुनील गावसकरांचा विराट कोहलीला अनोखा सल्ला..!
विराट कोहली
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 4:00 PM

मुंबई : 2020मध्ये बॅट निकामी झाली आणि 2021मध्येही ती शांत राहिली.. विराट कोहली(Virat Kohli)ची बॅट 2 वर्षांपासून तळपली नाही. जो खेळाडू क्रीजवर उतरताच धावांचा पाऊस पडत असे, ज्या खेळाडूसमोर मोठमोठे गोलंदाज घाबरायचे, आता त्याच खेळाडूला शतकाची आस लागलीय. गेल्या काही वर्षांत विराट कोहलीच्या बॅटनं आंतरराष्ट्रीय शतक (Century) ठोकलेलं नाही. विराटची अडचण वर्षाच्या शेवटच्या कसोटीतही कायम होती. सेंच्युरियन कसोटीच्या दोन्ही डावात विराट कोहली फ्लॉप ठरला होता.

अफलातून सल्ला कोणत्याही फलंदाजाचा फॉर्म येत-जात राहतो पण विराट कोहली ज्या पद्धतीनं बाद होत आहे ते खरोखरच चिंताजनक आहे. विराटच्या या खराब फॉर्मबाबत माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय कसोटी कर्णधाराला अफलातून सल्ला दिलाय. सुनील गावसकर म्हणतात, की विराट कोहलीनं दिग्गज सचिन तेंडुलकरला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तर त्याची समस्या दूर होऊ शकते.

त्यानं चौथ्या टेस्टमध्ये ठरवलं सेंच्युरियन कसोटी संपल्यानंतर सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला हा मजेशीर सल्ला दिला. सुनील गावसकर म्हणाले, की विराटनं सचिन तेंडुलकरला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तर खूप छान होईल. या संभाषणादरम्यान, तो सचिनला त्याचे ऑफ-साइड शॉट्स कसे थांबवायचे हे विचारू शकतो. 2003-04च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसं सचिननं स्वतः केलं होतं. सुनील गावसकर म्हणाले, की सचिन तेंडुलकरदेखील विराट कोहलीसारख्याच समस्येशी झुंजत होता. कव्हर्स आणि विकेटच्या मागे सचिन सतत आऊट होत होता आणि त्यानंतर चौथ्या टेस्टमध्ये सचिननं ठरवलं, की तो ऑफ साइडला शॉट्स खेळणार नाही. यानंतर चौथ्या कसोटीत सचिन तेंडुलकरनं नाबाद २४१ धावांची खेळी केली. सचिन तेंडुलकरशी बोलल्यानंतर विराट कोहलीला नक्की कळेल, की मास्टर ब्लास्टरनं हे कसं केलं?

सतत होतोय बाद सेंच्युरियन कसोटीच्या दोन्ही डावात विराट कोहली बाहेर जाणार्‍या चेंडूंवर फटके मारत बाद झाला. विराट कोहलीनं पहिल्या डावात 10व्या स्टंपच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या डावात त्यानं 8व्या स्टंपच्या चेंडूशी छेडछाड करताना विकेट गमावली.

2021 ठरलं वाईट 2021 हे वर्ष विराट कोहलीसाठी खूप वाईट होतं. विराटनं 11 कसोटीत केवळ 28.21च्या सरासरीनं 536 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून फक्त 4 अर्धशतकं झळकली. 2021मध्येही विराट कोहलीची कसोटी सरासरी 20पेक्षा कमी होती. आशा आहे, की विराट कोहली नवीन वर्षापासून नवीन सुरुवात करेल आणि त्याचा शतकांचा दुष्काळ संपेल.

IND vs SA ODI Series : पुढील 24 तासात टीम सिलेक्शन, Rohit Sharma ची फिटनेस टेस्ट अद्याप बाकी

IND vs SA: VIDEO: जिंकल्यानंतर टीम इंडियासोबत आफ्रिकन्सही हॉटेलमध्ये जोरदार नाचले

IND VS SA: नेटमध्ये ते आम्हाला सहकारी समजत नाहीत, सामन्यानंतर केएल राहुलचं वक्तव्य

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.