AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मयंतीची पँट तर मी घालतो, तू का घातलीस रॉबिन? Live कार्यक्रमात सुनील गावस्करने प्रश्न विचारला आणि…

आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं बारकाईने निरीक्षण केलं जात असल्याचं सोशल मीडियावर दिसतं. यात मयंती लँगर आणि सुनील गावस्कर यांच्या ड्रेस कोडही सुटला नाही. आता या यादीत रॉबिन उथप्पाचं नाव जोडलं गेलं आहे. लाईव्ह शोमध्ये सुनील गावस्कर यांनी पँटचा उल्लेख केला.

मयंतीची पँट तर मी घालतो, तू का घातलीस रॉबिन? Live कार्यक्रमात सुनील गावस्करने प्रश्न विचारला आणि...
मयंती लँगर, रॉबिन उथप्पा आणि सुनील गावस्करImage Credit source: Twitter
| Updated on: May 22, 2025 | 7:59 PM
Share

क्रिकेट विश्वातील अनेक घडामोडींबाबत सोशल मीडियावर चर्चा होत असते. काही गोष्टी तर इतक्या मजेशीरपणे मांडल्या जातात की हसू येतं. क्रिकेटबाबत अनेक मीम्स शेअर केले जातात. गेल्या काही वर्षात क्रिकेट चाहत्यांमध्ये मयंती लँगर आणि सुनील गावस्कर यांच्या कपड्यांबाबत चर्चा असते. खरं तर ही बाब मजेशीरपणे शेअर केली जाते. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही या मीम्सची दखल घेतली आहे. लाईव्ह कार्यक्रमात त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि एकच हास्यस्फोट झाला. क्रिकेट लाईव्ह शो दरम्यान मेकअप आर्टिस्ट सारखा ड्रेस कोड करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुनील गावस्कर मयंती लँगरची पँट घालतात असे मीम्स तयार होता. आता या मीम्समध्ये एक बाब आणखी जोडली गेली आहे. आयपीएलच्या एका सामन्यात सुनील गावस्कर ग्राउंडवर होते. तर मयंती लँगर आणि रॉबिन उथप्पा स्टुडिओतून बोलत होते. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना होता. तेव्हा प्री मॅच सामन्यादरम्यान सुनील गावस्कर यांनी मजेशीरपणे प्रश्न विचारला आणि हास्यकल्लोळ झाला.

…रॉबिन मयंतीची पँट तर मला घालायची होती

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कार्यक्रम सुरु असताना तीक्ष्ण नजरेने दोघांच्या ड्रेस कोडकडे कटाक्ष टाकला. त्यानंतर त्यांच्यातील विनोदाला उफळी आली. त्याने क्षणाचाही विलंब न करता बोलले की, ‘रॉबिन तू मयंतीची ट्राउजर का घातली आहेस. ती तर मला घालायला हवी होती.’मयंती लँगरने गडद लाल रंगाचा (वन-पीस ड्रेस) घातला होता, तर दुसरीकडे उथप्पानेही त्याच रंगाचा सूट घातला होता. मयंती लँगरने गावस्कर आणि उथप्पा यांच्यातील चर्चेतही उडी घेतली आणि म्हणाली, “आज आमचा स्टायलिस्ट बोलला, तुम्ही किंवा मी नाही. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मीम व्हायरल करा. सनी जी, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत.”

सुनील गावस्कर आणि मयंती लँगर यांनी अनेक क्रिकेट लाईव्ह शो दरम्यान अशा पद्धतीचे कपडे परिधान केले आहेत. भारत न्यूझीलंड 2023 वर्ल्डकप उपांत्य फेरी आणि भारत-पाकिस्तान 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत साखळी फेरीतही असाच ड्रेस कोड केला होता. त्यानंतर अनेक मीम्स व्हायरल झाले होते.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....