ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी सूर्याचा टीममधून पत्ता कट, आयुष म्हात्रेला संधी, कॅप्टन कोण?
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने आशिया कप ट्रॉफी जिंकली. पण सूर्यकुमारचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरला आहे. कारण या स्पर्धेत त्याने काहीच खास केलं नव्हतं. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्याला आणखी एक धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी संघाची घोषणा करताना टीम इंडियात बरीच उलथापालथ झाल्याचं दिसून आलं आहे. रोहित शर्माकडून वनडे संघाचं कर्णधारपद काढून ते गिलकडे सोपवलं आहे. आता गिलकडे टी20 संघाचं कर्णधारपद सोपवलं जाण्याची चर्चाही सुरु झाली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सूर्यकुमार यादव धक्का बसला आहे. एकीकडे फॉर्म नसल्याने त्याच्यावर टीका होत आहे. दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉफी स्पर्धेपूर्वी पहिल्या सामन्यातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सराव आणि फलंदाजीची चाचणी करण्याची एक संधी हातून गेली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव आता थेट ऑस्ट्रेलियात खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याला त्याचा फॉर्म परत आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 फेब्रुवारीत होणार आहे. अशा स्थितीत त्याच्याकडे फार काही वेळ नाही.
सूर्यकुमार यादवचा रणजी संघातून पत्ता कापला
रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेचं पर्व 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यात 38 संघ सहभागी होणार आहेत. मुंबईचा पहिला सामना जम्मू काश्मीरशी होणार आहे. हा सामना 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली असून 16 खेळाडूंची निवड केली आहे. मात्र सूर्यकुमार यादवला या संघातून डावलण्यात आलं आहे. मागच्या पर्वात सूर्यकुमार यादव संघाचा भाग होता. सूर्यकुमार यादवचा सध्याचा फॉर्म आणि नवीन खेळाडूंना संधी देण्याची इच्छा दिसून आली. दरम्यानस सूर्यकुमार यादव 20 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. भारताचा पहिला टी20 सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे.
सूर्यकुमार यादव या सामन्यात खेळला असता तर त्याला सरावाची चांगली संधी मिळाली असती. पण त्याला विश्रांती देण्यात आली असण्याची शक्यता आहे. लगेचच दोन दिवसांनी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दुसरीकडे, कर्णधारपदाची धुरा अष्टपैलू शार्दुल ठाकुरकडे देण्यात आली आहे. रहाणे संघात आहे मात्र त्याने या स्पर्धेपूर्वीच पद सोडण्याचं जाहीर केलं होतं. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेला शिवम दुबे मात्र संघात आहे.
पहिल्या सामन्यासाठी मुंबईचा संघ: शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, शिवम दुबे, सरफराज खान, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसोझा, हार्दिक तोमोरे (विकेटकीपर), मुरफान खान, मुरली खान, मुरली खान. हेरवाडकर, रॉयस्टन डायस.
