AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs GT IPL 2023 : ’12 तारखेला भेटू’, Suryakumar Yadav चं ऑन कॅमेरा गुजरातच्या मोठ्या प्लेयरला चॅलेंज

MI vs GT IPL 2023 : या ओव्हर्समध्ये अन्य फलंदाज फसतात. पण सूर्या याच ओव्हर्समध्ये आक्रमक होऊन समोरच्या टीमला कुटतो. आज वानखेडेच्या पीचवर क्रिकेट रसिकांना दोघांमघील संग्राम पहायला मिळणार.

MI vs GT IPL 2023 : '12 तारखेला भेटू', Suryakumar Yadav चं ऑन कॅमेरा गुजरातच्या मोठ्या प्लेयरला चॅलेंज
Suryakumar yadav IPL 2023
| Updated on: May 12, 2023 | 2:50 PM
Share

मुंबई : वानखेडेवर आज क्रिकेट रसिकांना रनसंग्राम पहायला मिळणार आहे. सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये आलाय. प्रतिस्पर्धी टीमची तो काही चेंडूत वाट लावू शकतो. विराट कोहलीच्या RCB ने याचा अनुभव घेतलाय. आता गुजरात टायटन्सची बारी आहे. शुक्रवारी रात्री वानखेडेच्या पीचवर मुंबई आणि गुजरातच्या टीम भिडतील. मुंबईची टीम एकदम मोक्याच्या क्षणी फॉर्ममध्ये आलीय. त्याचवेळी गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे.

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. चालू सीजनमध्ये फक्त गोलंदाजीच्या बाबतीत गुजरातची टीम मुंबईपेक्षा थोडी सरस वाटते. पण मुंबईकडे मॅच फिरवणारे आक्रमक बॅट्समन आहेत.

हे खूप रोमांचक द्वंद असेल

आज वानखेडेच्या पीचवर क्रिकेटरसिक सूर्यकुमार यादव विरुद्ध राशिद खान हा सामना पहायला उत्सुक्त आहेत. एका बॅटने आग ओकतोय, तर दुसरा बॉलने. हे खूप रोमांचक द्वंद असेल. आयपीएलचा 57 वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये होणार आहे. या मॅचआधी सूर्याने राशिदला चॅलेंज केलय.

राशिदने सूर्याबद्दल कमेंट केली होती

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या गोलंदाजांना पालापाचोळा करणाऱ्या सूर्याने गुजरातच्या राशिद खानला चॅलेंज दिलय. सूर्याने बँगलोर विरुद्ध 35 चेंडूत 83 धावा फटकावताना 7 फोर आणि 6 सिक्स मारले. त्याची बॅटिंग पाहून राशिदने कमेंट केली होती. आम्ही गोलंदाजांनी सूर्याला कुठे बॉलिंग करायची? त्यावर सूर्याने ऑन कॅमेरा चॅलेंज देताना 12 तारखेला भेटू असं म्हटलय.

हायवोल्टेज मिडिल ओवर

सूर्या आणि राशिदमध्ये आता जबरदस्त सामना पहायला मिळू शकतो. राशिद गुजरातचा सर्वात मोठा विकेट टेकर बॉलर आहे. त्याने 19 विकेट घेतलेत. तो आयपीएलमध्ये अजूनपर्यंत सूर्यकुमारची विकेट काढू शकलेला नाही. मात्र सूर्याच्या अडचणी वाढवू शकतो. मीडिल ओव्हर्समध्ये अनेकदा सामने बोरिंग वाटतात. गुजरात आणि मुंबईचा सामना मिडल ओव्हर्समध्ये जास्त हायवोल्टेज होऊ शकतो. याच ओव्हरमध्ये सूर्या जास्त घातक

सूर्या मधल्या ओव्हर्समध्येच जास्त स्फोटक बॅटिंग करतो. बहुतांश फलंदाज 7 ते 16 ओव्हर्समध्ये फसतात. पण सूर्या याच ओव्हर्समध्ये समाचार घेतो. आयपीएल 2023 च्या मीडल ओव्हर्समध्ये सूर्याचा स्ट्राइक रेट 195.95 आहे. त्याने आतापर्यंत 37.66 च्या सरासरीने 339 धावा केल्यात. मिडल ओव्हर्समध्ये तो 9 वेळा आऊट झालाय, हे सुद्धा वास्तव आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.