W, W, W..! नितीश कुमारने टी20 क्रिकेटमध्ये घेतली हॅटट्रीक, पण… Watch Video
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेत आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यात लढत झाली. या सामन्यात मध्य प्रदेशने 4 विकेट आणि 15 चेंडू राखून विजय मिळवला. पण या सामन्यात नितीश कुमार रेड्डीच्या हॅटट्रीकने लक्ष वेधून घेतलं.

सय्यद मुश्ताक अली 2025 टी20 स्पर्धेत सुपर लीग फेरीचा थरार रंगला आहे. दोन गटात एकूण 4 संघ असून टॉपला असलेला संघ अंतिम फेरीत जागा मिळवणार आहे. त्यामुळे या फेरीत चुरस पाहायला मिळत आहे. या फेरीत प्रत्येक संघ एकूण तीन सामने खेळणार आहे. सुपर लीग ए गटात मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश हे दोन संघ आमनेसामने आले होते. मध्य प्रदेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आंध्र प्रदेशचा संघ फार काही चांगलं करू शकला नाही. 19.1 षटकात सर्व गडी गमवून 112 धावा केल्या आणि विजयासाठी फक्त 113 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान मध्य प्रदेशने 17.3 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. पण हा विजय काही सोपा नव्हता. त्याला कारण ठरला नितीश कुमार रेड्डी.. त्याच्या हॅटट्रीकमुळे मध्य प्रदेशचा संघ बॅकफूटवर गेला होता. पण ऋषभ चौहानने 47 आणि राहुल बाथमने नाबाद 35 धावा केल्याने विजय सोपा झाला.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत विजयी धावांचा पाठलाग करण्याासठी हर्ष गवली आणि वेंकटेश अय्यर ही जोडी मैदानात उतरली. पण तिसऱ्या षटकातच मध्य प्रदेशचा संघ बॅकफूटवर गेला. कारण नितीश कुमार रेड्डीने या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूवर तीन विकेट काढल्या. नितीश कुमार षटक टाकण्यासाठी आला तेव्हा समोर हर्ष गवळी होता. त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव घालवले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवला. पण चौथ्या चेंडूवर हर्ष गवळीला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हरप्रीत सिंगला खातंही खोलता आलं नाही. गोल्डन डकवर तंबूत परतला. संघ अडचणीत असताना कर्णधार रजत पाटीदार फलंदाजीला आला. पण त्याचा त्रिफळा उडवला आणि नितीश कुमारने हॅटट्रीक पूर्ण केली.
🚨 𝗛𝗔𝗧-𝗧𝗥𝗜𝗖𝗞 𝗔𝗟𝗘𝗥𝗧 🚨
Moment of sheer brilliance by Nitish Kumar Reddy as he completed a superb hat-trick against Madhya Pradesh in the Super League Stage in Pune 👏#SMAT | @IDFCFIRSTBank | @NKReddy07 pic.twitter.com/3iv0wo1kFI
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2025
नितीश कुमार रेड्डीने ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
नितीश कुमार रेड्डी टी20 संघात खेळण्यासाठी धडपड करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याला संघात जागा मिळू शकते. पण तसं टी20 वर्ल्डकपपर्यंत तरी शक्य नाही असं दिसत आहे. त्याने मागचा टी20 सामना याच वर्षी जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध कोलकाता मैदानात खेळला होता. त्यामुळे त्याला अचानक संघात घेणं कठीण आहे.
