AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFG vs NAM, T20 World Cup 2021: अफगाणिस्तानचा नामिबियावर 62 धावांनी मोठा विजय, गुणतालिकेत दुसरं स्थान

T20 विश्वचषक 2021 मध्ये अफगाणिस्तानची उत्कृष्ट कामगिरी नामिबियाविरुद्धच्या सामन्यातही कायम राहिली. त्यांनी नामिबियाविरोधात मोठा विजय मिळवला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांमधला हा त्यांचा दुसरा विजय आहे.

AFG vs NAM, T20 World Cup 2021: अफगाणिस्तानचा नामिबियावर 62 धावांनी मोठा विजय, गुणतालिकेत दुसरं स्थान
AFG vs NAM
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 7:57 PM
Share

मुंबई : T20 विश्वचषक 2021 मध्ये अफगाणिस्तानची उत्कृष्ट कामगिरी नामिबियाविरुद्धच्या सामन्यातही कायम राहिली. त्यांनी नामिबियाविरोधात मोठा विजय मिळवला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांमधला हा त्यांचा दुसरा विजय आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एका पराभवानंतर त्यांनी चांगलं पुनरागमन केलं आहे. अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडवर 130 धावांनी मोठा विजय मिळवला होता. नामिबियावरील विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ त्यांच्या गटात 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयासह त्यांनी आपला सहकारी खेळाडू आणि माजी कर्णधार असगर अफगाणलाही शानदार निरोप दिला आहे. असगर अफगाणचा हा शेवटचा सामना होता. (T20 World Cup 2021 : Afghanistan Defeated Namibia by 62 runs)

दुसरीकडे, या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांमध्ये नामिबियाच्या संघाचा हा दुसरा पराभव आहे. नामिबियाने स्कॉटलंडविरुद्धचा एकमेव सामना जिंकला आहे. या पराभवानंतर नामिबिया सध्या ग्रुप 2 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे पण भारत-न्यूझीलंड सामन्यानंतर त्यांच्या स्थानात बदल होऊ शकतो.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकात 5 गडी गमावून 160 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर मोहम्मद शहजादने 33 चेंडूत 45 धावा केल्या. याशिवाय जजाईने 27 चेंडूत 33 धावा केल्या. असगर अफगाणने 23 चेंडूत 31 तर कर्णधार मोहम्मद नबीने 17 चेंडूत 32 धावा केल्या. नामिबियासाठी ट्रम्पमन पुन्हा एकदा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 2 बळी घेतले.

62 धावांनी शानदार विजय

अफगाणिस्तानने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात नामिबियाचा संघ अपयशी ठरला. या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचे फलंदाज एकही भागीदारी रचू शकले नाहीत. जे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. नामिबियासाठी डेव्हिड व्हिसाने सर्वाधिक 26 धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाने 20 धावांचा आकडा गाठला नाही. संपूर्ण संघ 20 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 98 धावा करू शकला आणि हा सामना 62 धावांच्या मोठ्या फरकाने गमावला. अफगाणिस्तानकडून हमीद हसन आणि नवीन-उल-हक हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले, या दोघांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.

असगर अफगाण निवृत्त

अफगाणिस्तानचा पहिला स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार असगर अफगाण (Asghar Afgan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अंतिम सामन्या वेळी मैदानातच त्याला अश्रू अनावर झाले. कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात तो निवेदकाशी बोलताना तसेच तंबूत गेल्यावरही रडत असल्याचं पाहायला मिळालं. असगरने त्याच्या अखेरच्या सामन्यात 23 चेंडूत 31 धावांची खेळी केली.

असगरची कारकिर्द

असगरने 2009 साली स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय डेब्यू केला. त्याने अफगानिस्तानकडून 6 टेस्ट सामने, 115 वनडे आणि 75 टी-20 सामने खेळले. टेस्टमध्ये 44.00 च्या ,सरासरीने 440 रन आणि वनडेमध्ये 24.73 च्या सरासरीने 2 हजार 467 रन केले आहेत. भी बनाए हैं. त्याने दोन्ही प्रकारात एक-एक शतकही लगावलं आहे. तर टी20 फॉर्मेटमध्ये 1 हजार 358 धावा त्याने केल्या आहेत. असगरने 59 वनडे आणि 52 टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून काम पाहिलं. यात 52 पैकी 42 टी20 सामन्यात अफगाणिस्तानचा संघ विजयी झाला.

इतर बातम्या

T20 World Cup : हार्दिक पंड्याला आणखी एक संधी, NZ विरुद्धच्या सामन्यात जुन्या Playing XI सह टीम इंडिया मैदानात उतरणार?

T20 World Cup मध्ये 6 चेंडूत 4 षटकार ठोकून सामना जिंकणाऱ्या खेळाडूचा ट्विटरवर सवाल, ‘अजून काही आदेश?’

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खान चमकला, मलिंगाला टाकलं मागे

(T20 World Cup 2021 : Afghanistan Defeated Namibia by 62 runs)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.