AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : टीम इंडियाचं CSK च्या पावलावर पाऊल, Playing XI बदलणार नाही

भारतीय क्रिकेट संघाची आयसीसी टी-20 विश्वचषकातील मोहिमेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पाकिस्तानने त्यांचा 10 गडी राखून दारुण पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हन कॉम्बिनेशनबाबत सर्वाधिक प्रश्न उपस्थित झाले.

T20 World Cup : टीम इंडियाचं CSK च्या पावलावर पाऊल, Playing XI बदलणार नाही
MS Dhoni - Virat Kohli
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 11:42 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाची आयसीसी टी-20 विश्वचषकातील मोहिमेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पाकिस्तानने त्यांचा 10 गडी राखून दारुण पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हन कॉम्बिनेशनबाबत सर्वाधिक प्रश्न उपस्थित झाले. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारत आपल्या संघात बदल करू शकेल असे वाटत होते पण तसे होताना दिसत नाही. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या धर्तीवर भारतीय संघ व्यवस्थापन टी-20 विश्वचषकात रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या ‘करो किंवा मरो’ सामन्यात जुन्याच प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरवू शकते. सीएसके संघाला अशी सवय आहे, एक-दोन सामने गमावले तरी सीएसके संघ त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सहसा बदल करत नाही. ज्या प्लेईंग इलेव्हनला पाकिस्तानने दहा विकेट्स राखून पराभूत केले त्याच प्लेईंग इलेव्हनवर भारतीय संघ व्यवस्थापन विसंबून राहू शकतं. (T20 World Cup 2021 : Team india can play with same playing eleven against new zealand)

केवळ एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तरच संघात बदल होईल, अन्यथा तेच खेळाडू अंतिम-11 मध्ये असतील जे पाकिस्तानविरुद्ध खेळले होते. पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे टीम कॉम्बिनेशनबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, पण न्यूझीलंडविरुद्धच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये धोनीचे मत महत्त्वाचे ठरणार असल्याचे समजते.

हार्दिक पंड्याला आणखी एक संधी

याचाच अर्थ असा की, हार्दिक पांड्याच्या जागी शार्दुल ठाकूरला मैदानात उतरवण्याची शक्यता नाही. ठाकूरला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पसंती दिली जात होती आणि त्यामुळे पंड्याच्या जागी त्याच्या नावाची चर्चा होती, पण ठाकूरला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला कोणीही पसंत करणार नाही. असे समजते की भारतीय संघातील सर्व निर्णयकर्त्यांना असे वाटते की ठाकूर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी योग्य नाही. गोलंदाजीचा विचार केला तर ठाकूर विकेट घेणारा गोलंदाज असला तरी तो धावा देणारा आहे. पांड्याने गोलंदाजी सुरू केली आहे कारण त्यालाही माहीत आहे की त्याशिवाय आता चालणार नाही.

निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पंड्या आयपीएलमध्ये गोलंदाजी करेल असे सांगितले होते, पण तसे झाले नाही. पांड्याने एकही षटक टाकले नाही तर त्याची संघात जागा बनत नाही. अशा स्थितीत ठाकूर खेळू शकला असता, पण सूत्रांवर विश्वास ठेवला तर, भुवनेश्वर कुमारला न्यूझीलंडविरुद्ध खेळवले जाईल आणि त्याचे कारण त्याचे वेगळेपण आहे. संघाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात तो यशस्वी झाला तर कुमार खूप प्रभावी ठरू शकतो. वरुण चक्रवर्ती पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर खेळण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहलीला फिरकी आक्रमण बदलायचे नसेल तर रविचंद्रन अश्विनला पुन्हा बाहेर बसावे लागेल.

इतर बातम्या

T20 World Cup : मोहम्मद रिझवानची एमएस धोनीशी बरोबरी, पुढच्या सामन्यात विक्रम मोडणार!

T20 World Cup 2021: पाकिस्तानची दमदार हॅट्रीक, सलग तिसऱ्या सामन्यात मिळवला विजय, अफगाणिस्तानला 5 विकेट्सनी दिली मात

T20 World Cup: दिग्गज माजी कर्णधाराने विराटला दिला विजयाचा मंत्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले दोन महत्त्वाचे बदल

(T20 World Cup 2021 : Team india can play with same playing eleven against new zealand)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.