AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठताच ऑस्ट्रेलियाकडून गंभीर आरोप, काय झालं वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियासारखा दिग्गज संघ सुपर 8 फेरीतूनच आऊट झाला आहे. इतकंच काय तर अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठली आहे. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ही बाब काही रूचलेली दिसत नाही. इंग्लंडचा पत्ता साखळी फेरीतच कापण्याची स्वप्न पाहण्याऱ्यांची सुपर 8 मध्ये दुर्दशा झाली आहे.

अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठताच ऑस्ट्रेलियाकडून गंभीर आरोप, काय झालं वाचा
| Updated on: Jun 25, 2024 | 7:49 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानची कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. अफगाणिस्तानने गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला लिंबू टिंबू समजण्याची चूक महागात पडू शकते हे दाखवून दिलं आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंड असो की ऑस्ट्रेलिया या दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. आता उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. पण असं असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ही बाब काही रुचलेली नाही. त्यांनी अफगाणिस्तानवर अप्रामाणिकपणाचा आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज एडम झाम्पाने गुलबदिन नईबवर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेशच्या डावातील 12 व्या षटकात पावसाची रिमझिम सुरु झाली आणि अफगाणी हेड कोच जॉनथन ट्रॉन इशारा केला. या माध्यमातून खेळाडूंना सावकाश खेळायला सांगितल्याचा आरोप आता होत आहे.

नूर अहमद गोलंदाजी करत होता आणि चार चेंडू टाकून झाले होते. पण पाचवा चेंडू टाकेपर्यंत गुलबदीन नईब खाली पडला आणि अफगाणिस्तानचा फिजिओ मैदानात आला. त्यात पावसाचं आगमन झाल्याने सामना थांबवावा लागला. या कालावधीत डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा संघ पिछाडीवर होता. पण जेव्हा पाऊस थांबला तेव्हा गुलबदिन नईब मैदानात आला आणि त्याने गोलंदाजीही केली. इतकंच काय तर अफगाणिस्तानच्या विजयानंतर मैदानात सर्वात वेगाने धावतही तोच होता.

गुलबदीन नईबच्या या कृतीमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू नाराज आहेत. गुलबदीन मैदानात जेव्हा असं काही करत होता तेव्हा कर्णधार राशिद खान नाराज असल्याचं दिसलं. पण नंतर त्याने सांगितलं की, गुलबदिन नईबमुळे सामन्यावर काही एक फरक पडलेला नाही. पण गुलबदिन नईबला असं वागणं महागात पडू शकतं. त्याच्यावर आयसीसीकडून कारवाई होऊ शकते. दरम्यान, डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशसमोर 19 षटकात 114 धावांचं आव्हान होतं. मात्र बांगलादेशचा संघ 17.5 षटकात सर्व गडी बाद 105 करू शकला. हा सामना अफगाणिस्तानने 8 रन्सने जिंकला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शकीब अल हसन, महमुदुल्ला, सौम्या सरकार, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.