IND vs USA : अमेरिकेविरुद्ध नाणेफेकीचा कौल रोहित शर्माने जिंकला, गोलंदाजी घेत म्हणाला की…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला. रोहित शर्मान तात्काळ खेळपट्टीचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या सामन्यात विजयी संघाल थेट सुपर 8 चं तिकीट मिळणार आहे. दुसरीकडे, या सामन्यावर पाकिस्तानचीही नजर लागून आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 25वा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयी संघ सुपर 8 फेरीत खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने या खेळपट्टीवर दोन सामने खेळले असून त्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या विजयासाठी टीम इंडिया आतुर आहे. दुसरीकडे, अमेरिकेने या स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे. दिग्गज पाकिस्तान संघाला पराभूत केल्याने कमी लेखणं महागात पडू शकतं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीनंतर रोहित शर्माने सांगितलं की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गेल्या दोन गेममध्ये या खेळपट्टीचा अंदाज आहे. पण असं असलं तरी परिस्थितीचे त्वरीत मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि नंतर डाव ताब्यात घेऊ. हे सर्व सततच्या चांगल्या प्रयत्नांनी होत आहे. योग्य गोष्टी करणे महत्वाचे आहे.”
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबतही रोहित शर्माला विचारण्यात आलं. तेव्हा त्याने सांगितलं की, “आमच्याकडे बोर्डावर पुरेशा धावा नव्हत्या, पण गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि सामना जिंकवला.” दरम्यान रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे, अमेरिकेचा कर्णधार एरॉन जोन्सने सांगितलं की, “आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती, गोलंदाजांना लवकर मदत होते.”
मोनांक पटेल आजच्या सामन्यात नाही. त्यावर जोन्सने सांगितलं की, “त्याला खूप त्रास होत आहे आणि तो लवकर परत आला पाहिजे. आम्ही चांगले खेळण्याचा विचार करत आहोत. शिबिर खूप सकारात्मक आहे, फक्त काही चांगले क्रिकेट खेळायचे आहे. मोनांकच्या जागी शायन जहांगीर आणि नॉथुशऐवजी शेडली संघात असेल.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
युनायटेड स्टेट्स (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), एरॉन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान.
