AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-कॅनडा सामना रद्द होताच पाकिस्तानचं रडगाणं सुरु, आता असं सर्व गणित मांडत ठेवलं बोट

अ गटातील साखळी फेरीतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्याच्या निकालाचा तसा काही फरक पडणार नव्हता. त्यामुळे सामना झाला काय आणि नाही काय काहीच फरक पडला नाही. पण पाकिस्तानला मात्र या सामन्यातील एक गोष्ट खटकली आणि आपलं रडगाणं सुरु केलं. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

भारत-कॅनडा सामना रद्द होताच पाकिस्तानचं रडगाणं सुरु, आता असं सर्व गणित मांडत ठेवलं बोट
| Updated on: Jun 15, 2024 | 10:42 PM
Share

फ्लोरीडातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून ढगाळ होतं. त्यात पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. अशा परिस्थितीत येथे सामना होणं कठीण होतं. संपूर्ण मैदान ओलं असल्याने एकही चेंडू टाकणं कठीण होतं. त्यामुळे अमेरिका आयर्लंड सामना रद्द केल्यानंतर भारत कॅनडा सामन्यातही असंच काहीसं झालं. अ गटातील साखळी फेरीतील शेवटचा सामना आउटफिल्ड ओली असल्याने रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण वाटून दिला आणि विषय तिथेच संपला. पण पाकिस्तानची पोटदुखी इथूनच सुरु झाली आणि त्यांनी मैदानातील व्यवस्थानावर टीकास्त्र सोडलं. कारण भारत कॅनडा हा सामना व्हावा यासाठी ग्राउंड्समॅननी खूप प्रयत्न केला. मैदान सुकवण्यासाठी तीन ड्रायर मशिन्सचा वापर करण्यात आला होता. पण असं असूनही शेवटी सामना रद्द करावा लागला. आता पाकिस्तानने मैदान व्यवस्थापनावर आरोप केला आहे.

भारत कॅनडा सामन्यात तीन ड्रायरचा वापर करण्यात आला होता. तर अमेरिका आणि आयर्लंड सामन्यात तीन तासांसाठी पाऊस थांबल्यानंतर फक्त एकाच ड्रायर मशिनचा वापर करण्यात आला. ज्या सामन्यावर पाकिस्तानचं नशिब लागलं होतं. त्या सामन्यासाठी फक्त एकच ड्रायर मशिन्सचा वापर केला गेला, असा आरोप पाकिस्तानी क्रीडाप्रेमी करत आहे. खरं तर दबक्या आवाजात पाकिस्तानला बाहेर करण्यासाठी कट रचल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र याबाबत कोणीही उघडपणे बोलत नाही. 14 जूनला अमेरिका आणि आयर्लंड यांच्या सामना होणार होता.

अमेरिका आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्याने त्याचा थेट फायदा अमेरिकन संघाला झाला. अमेरिकन संघाला थेट सुपर 8 फेरीचं तिकीट मिळालं. तर पाकिस्तानचं जर तरच सर्वच गणित फिस्कटलं. पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्याने सर्वच बाजूने टीका होत आहे. दुसरीकडे, अमेरिकेने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं हे कसं विसरून चालेल. पाकिस्तानला विजयासाठी झुंजवलं, इतकंच काय तर सुपर ओव्हरमध्या सामना खेचून आणला. त्यामुळे अमेरिकेची कामगिरी चांगली होती यात काही शंका नाही.

अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.