AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PNG: न्यूझीलंडचा शेवट गोड, पीएनजी विरुद्ध 7 विकेट्सने विजय

New Zealand vs Papua New Guinea: न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे.

NZ vs PNG: न्यूझीलंडचा शेवट गोड, पीएनजी विरुद्ध 7 विकेट्सने विजय
New Zealand vs Papua New Guinea
| Updated on: Jun 18, 2024 | 12:27 AM
Share

न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील मोहिमेचा शेवट हा विजयाने केला आहे. वर्ल्ड कपमधील 39 व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनिआ आमनेसामने होते.न्यूझीलंडने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. पीएनजीने विजयासाठी दिलेलं 79 धावांचं आव्हान हे 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 12.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 79 धावा केल्या. मात्र पीएनजीनेही न्यूझीलंडच्या नाकीनऊ आणले होते. मात्र किवींनीच बाजी मारली. न्यूझीलंडचा हा एकूण दुसरा विजय ठरला. तर पीएनजीच्या विजयाची पाटी कोरीच राहिली.

न्यूझीलंडची 79 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. फिन अॅलन दुसऱ्याच बॉलवर झिरोवर आऊट झाला. त्यानंतर न्यूझीलंडचा स्कोअर 20 असताना रचीन रवींद्र 6 धावा करुन मैदानाबाहेर परतला. त्यानंतर डेव्हॉन कॉन्व्हे याने 32 बॉलमध्ये 35 धावांची खेळी केली आणि आऊट झाला. कॅप्टन केन विलियमसन आणि डॅरल मिचेल या दोघांनी न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहचवलं. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 25 धावांची नाबाद भागीदारी केली. केनने 17 बॉलमध्ये नॉट आऊट 18 रन्स केल्या. तर डॅरेल मिचेलने 12 चेंडूत 19 धावांचं योगदान दिलं. पीएनजीकडून कबुआ मोरेया याने 2 विकेट्स घेतल्या. तर सेमो कामिया याने 1 विकेट घेतली.

दरम्यान त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून पीएनजीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र पीएनजीला 80 धावांपर्यंतही पोहचता आलं नाही. पीएनजीचा डाव हा 19.4 ओव्हरमध्ये 78 धावांवर आटोपला. पीएनजीकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसन याने चारही ओव्हर्स मेडन टाकत 3 विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट, इश सोढी आणि टीम साउथी या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सँटरन याने 1 विकेट घेतली.

न्यूझीलंडचा दुसरा विजय

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: केन विल्यमसन (कॅप्टन), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

पापुआ न्यू गिनी प्लेइंग इलेव्हन: असद वाला (कॅप्टन), टोनी उरा, चार्ल्स अमिनी, सेसे बाऊ, हिरी हिरी, चाड सोपर, किपलिन डोरिगा (विकेटकीपर), नॉर्मन वानुआ, अले नाओ, काबुआ मोरिया आणि सेमो कामिया.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.