PAK vs ZIM : पाकिस्तानच्या 148 धावा करताना नाकी नऊ, झिंबाब्वे विरुद्ध 4 बॉलआधी विजय
Pakistan vs Zimbabwe 1st T20i Match Result : श्रीलंकेला वनडे सीरिजमध्ये 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप करणाऱ्या यजमान पाकिस्तानला झिंबाब्वेने चांगलंच झुंजवलं.

यजमान पाकिस्तान क्रिकेट टीमने टी 20I ट्राय सीरिजमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानने झिंबाब्वे विरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला. मात्र झिंबाब्वेने पाकिस्तानला चांगलाच घाम फोडला. झिंबाब्वेने पाकिस्तानला प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला लावला. झिंबाब्वेने पाकिस्तानला सहजासहजी विजय मिळवून दिला नाही. झिंबाब्वेने हा सामना गमावला. मात्र त्यांनी पाकिस्तानला चांगलंच झुंजवलं. झिंबाब्वेने पाकिस्तानसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान शेवटचे 4 चेंडू बाकी असताना सामना जिंकला.
साहिबजादा फरहान आणि सॅम अयुब या सलामी जोडीला चांगल्या सुरुवातीनंतर झिंबाब्वेच्या गोलंदाजांनी मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. साहिबजादा फरहान 16 धावांवर आऊट झाला. श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक करणाऱ्या बाबर आझम याला झिंबाब्वे विरुद्ध भोपळाही फोडता आला नाही. बाबर झिरोवर आऊट झाला. कॅप्टन सलमान आघा 1 रन करुन आऊट झाला. तर सॅम अयुब याने 22 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानची 9.3 ओव्हरमध्ये 4 आऊट 54 अशी स्थिती झाली होती.
पाचव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी
फखर झमान आणि उस्मान खान या जोडीने पाकिस्तानसाठी पाचव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली. या दोघांनी 39 बॉलमध्ये 61 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर फखर झमान आऊट झाला. फखरने 32 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 44 रन्स केल्या.
त्यानंतर उस्मान खान याने मोहम्मद नवाझ याच्यासह अखेरच्या क्षणी निर्णायक भागीदारी करत पाकिस्तानला 4 बॉलआधी विजय मिळवून दिला. उस्मान आणि नवाझ या दोघांनी 20 बॉलमध्ये नॉट आऊट 36 रन्सची पार्टनरशीप केली. उस्मानने 28 बॉलमध्ये नॉट 37 रन्स केल्या. तर नवाझने 12 बॉलमध्ये नॉट आऊट 21 रन्स जोडल्या. झिंबाब्वेसाठी ब्राड एव्हान्स याने 2 विकेट्स घेतल्या. तर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. मात्र झिंबाब्वे अपयशी ठरली.
पाकिस्तानने टॉस जिंकला
त्याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून झिंबाब्वेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. झिंबाब्वेने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. झिंबाब्वेसाठी ब्रायन बेनेट याने सर्वाधिक 49 धावांचं योगदान दिलं. टी मारुमनी याने 30 रन्स केल्या. तर कॅप्टन रमी राझा याने अखेरपर्यंत नाबाद राहत 24 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. पाकिस्तानसाठी मोहम्मद नवाझ याने 2 विकेट्स घेतल्या. तर शाहीन आफ्रीदी, सलमान मिर्झा, सॅम अयुब आणि अब्रार अहमद या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
