AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Final : वर्ल्ड कप कोण जिंकणार? सामन्याआधीच ठरणार विजेता! जाणून घ्या आकडे

India vs New Zealand Final Icc T20i World Cup Final : टीम इंडियाची आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळण्याची ही एकूण चौथी तर सलग दुसरी वेळ आहे. हा सामना ऐतिहासिक नरेंद्र मोजी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

IND vs NZ Final : वर्ल्ड कप कोण जिंकणार? सामन्याआधीच ठरणार विजेता! जाणून घ्या आकडे
Narendra Modi Stadium India vs NZ FinalImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 08, 2026 | 5:22 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्याला अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे.  टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा सामना रविवारी 8 मार्चला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. जगातील सर्वात मोठ्या असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियमची आसन क्षमता ही 1 लाखापेक्षा जास्त आहे. तसेच भारतीय रेल्वेकडून या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये येण्यासाठी देशातील बहुतांश ठिकाणाहून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांची उपस्थिती असणार आहेत यात अजिबात शंका नाही.

टीम इंडिया यजमान आहे. तसेच घरच्या मैदानात सामना होत असल्याने भारताला चाहत्यांचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाने सलग दुसरा आणि एकूण तिसरा सामना जिंकावा, अशी आशा चाहत्यांना आहे. मात्र या महाअंतिम सामन्यातील विजेता कोण ठरणार हे काही अंशी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी ठरणार आहे, असं म्हटल तर वावगं ठरणार नाही. असं आम्ही नाही तर या मैदानातील आकडेवारी सांगत आहे.

अहमदाबादमध्ये टॉस जिंकून बॅटिंग की बॉलिंग?

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील हा सातवा सामना असणार आहे. याआधी झालेल्या 6 पैकी 4 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर 2 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत या मैदानात नेदरलँड्सवर 17 धावांनी मात केली होती. त्यामुळे आता अंतिम सामन्यात टॉस फॅक्टर किती महत्त्वाचा ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सूर्याची टी 20I कर्णधार म्हणून कामगिरी

सूर्यकुमार यादव याने भारताला कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं आहे. सूर्यकुमार यादव याचा टी 20I कर्णधार म्हणून हा 52 वा टी 20I सामना असणार आहे. सूर्याने त्याआधी टीम इंडियाला 51 पैकी 41 सामन्यांमध्ये विजयी केलं आहे. तर भारताला सूर्याच्या नेतृत्वात 8 टी 20I सामने गमवावे लागले आहेत. तर 2 सामन्यांचा निकाला लागला नाही. सूर्याची विजयी टक्केवारी ही 84 इतकी आहे. त्यामुळे आता सूर्या त्याच्या नेतृत्वात भारताला आणखी सामना जिंकून देत पहिल्याच झटक्यात टी 20i वर्ल्ड कप विजेता कर्णधार हा बहुमान मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल