AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : चक्रवर्ती 5 विकेट्स घेऊन चुकला? पुन्हा नको त्या योगायोगामुळे चर्चा

Varun Chakravarthy IND vs ENG 3rd T20I : टीम इंडियाला राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या टी 20I सामन्यात पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाच्या त्या पराभवासाठी वरुण चक्रवर्थी याची एक कृती जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.

IND vs ENG : चक्रवर्ती 5 विकेट्स घेऊन चुकला? पुन्हा नको त्या योगायोगामुळे चर्चा
Varun Chakravarty BowlingImage Credit source: PTI
| Updated on: Jan 29, 2025 | 10:50 AM
Share

टी 20I क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजांला जास्तीत जास्त 4 ओव्हर टाकता येतात. त्या 4 ओव्हरमध्ये 2-3 विकेट्स मिळणंही मोठी गोष्ट समजली जाते. टी 20I क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेणं ही मोठी आणि आव्हानात्मक बाब आहे. मात्र त्यानंतरही वरुण चक्रवर्थी याने टीम इंडियासाठी सर्वात कमी सामन्यांमध्ये ही अशी कामगिरी करुन दाखवलीय. मात्र त्यानंतर वरुणने पुन्हा टी 20I 5 विकेट्स घेऊ नये, असं आवाहन क्रिकेट चाहत्यांकडून केलं जात आहे. नक्की असं काय झालं? की ज्यामुळे वरुणने 5 विकेट्स पुन्हा घेऊ नयेत, असं म्हटलं जात आहे.

वरुणने राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी 20I सामन्यामध्ये 24 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. वरुण यासह टीम इंडियासाठी सर्वात कमी सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. मात्र यानंतरही वरुणचा नकोशा यादीत समावेश झाला आहे.

वरुणच्या या 5 विकेट्सनंतरही टीम इंडियाचा पराभव झाला. वरुणला दुसऱ्या बाजूने गोलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. वरुणने अप्रतिम बॉलिंग केली. मात्र वरुणसह योगायोगाने दुसऱ्यांदा असा प्रकार घ़डलाय. वरुणने 5 विकेट्स घेतल्यानंतर टीम इंडियाचा याआधीही पराभव झाला आहे. या नको त्या योगायोगामुळे क्रिकेट चाहते वरुणला पुन्हा टी 20I मध्ये 5 विकेट्स घेऊ नको, असं आवाहन करत आहेत.

वरुणने त्याच्या टी 20I कारकीर्दीत याआधी आणि पहिल्यांदा नोव्हेंबर 2024 मध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. वरुणने 17 धावा देत 5 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र त्या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा वरुणसोबत असं झालं. त्यामुळे वरुण पहिला असा गोलंदाज ठरलाय ज्याने 5 विकेट्स घेतल्यानंतर त्याच्या संघाचा पराभव झालाय.

दरम्यान टीम इंडियासाठी टी 20I मध्ये वरुण व्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल आणि दीपक चहर या चौघांनीही अशी कामगिरी केली आहे. तर वरुण, कुलदीप आणि भुवी या दोघांनी प्रत्येकी 2-2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. इतर गोलंदाजांनी जेव्हा 5 विकेट्स घेतल्या तेव्हा टीम इंडियाचा विजय झाला होता. मात्र वरुण त्याबाबत कमनशिबी ठरला, असंच म्हणावं लागेल.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: जोस बटलर (कर्णधार), फिलिप साल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...