Team India: टीम इंडियाची पुढील मालिका केव्हा? कुणाचं आव्हान?

Indian Cricket Team: टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्याचा शेवट गोड करता आला नाही. भारताला श्रीलंकेविरुद्ध 27 वर्षांनंतर एकदिवसीय मालिका गमवावी लागली. त्यानंतर आता टीम इंडिया कुणाविरुद्ध खेळणार? जाणून घ्या.

Team India: टीम इंडियाची पुढील मालिका केव्हा? कुणाचं आव्हान?
team india national anthemImage Credit source: axar patel x account
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 8:26 PM

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा आटोपला. टीम इंडियासाठी हा दौरा संमिश्र राहिला. टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने 3-0 ने मालिका जिंकली. त्यानंतर मात्र श्रीलंकेने इतिहास रचला. श्रीलंकेने टीम इंडियाला 27 वर्षांनंतर 3 सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या पुढील मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडियाची पुढील मालिका केव्हा आहे? ती मालिका कोणती आणि कुणाविरुद्ध आहे? हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यानंतर पुढील मालिकेत तब्बल 43 दिवसांचं अंतर आहे. टीम इंडियाची ब्लू आर्मी ही 19 सप्टेंबरला मदैानात उतरणार आहे. भारतासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. उभयसंघात कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांची टी20i मालिका होईल. कसोटी मालिका 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान टी 20i मालिका होणार आहे.

बांगलादेशच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

पहिला कसोटी सामना, 19-23 सप्टेंबर

दुसरा कसोटी, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर

टी 20i मालिका

पहिला सामना, 6 ऑक्टोबर, धर्मशाळा

दुसरा सामना, 9 ऑक्टोबर, दिल्ली

तिसरा सामना, 12 ऑक्टोबर, हैदराबाद

न्यूझीलंडचा भारत दौरा

बांगलादेशनंतर टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंड भारताचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 1 नोव्हेंबरपासून तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येईल.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 16-20 ऑक्टोबर, बंगळुरु दुसरा सामना, 24-28 ऑक्टोबर, पुणे तिसरा सामना, 1-5 नोव्हेंबर, मुंबई

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.