ENG vs IND : बरगड्यांवर बॉलचा फटका, टीम इंडियाच्या फलंदाजाला दुखापत! पहिल्या कसोटीला मुकणार?
England vs India 1st Test : इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा हेडिंग्ले लीड्समध्ये 20 ते 24 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. मात्र सामन्याच्या काही तासांआधीच टीम इंडियाच्या खेळाडूला दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे.

इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप2025-2027 या साखळीची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या अनुभवी फलंदाजाला सरावादरम्यान दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावं लागणार की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग याच्यानंतर त्रिशतक करणाऱ्या अनुभवी करुण नायर याला नेट्स प्रॅक्टीसदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे करुणला पहिल्या सामन्यात खेळता येणार की नाही? अशी शंका उपस्थित होत आहे.
करुण आणि प्रसिध कृष्णा आपसात सराव करत होते. करुण बॅटिंगची तर प्रसिध बॉलिंगची प्रॅक्टीस करत होता. प्रसिधने टाकलेल्या बॉलवर करुणने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र करुणचा अंदाज चुकला. त्यामुळे प्रसिधने टाकलेला बॉल करुणच्या बरगड्यांवर आदळला. करुणला हा बॉल किती वेगाने लागला? तसेच करुणला झालेली दुखापत चिंताजनक आहे का? याबाबत कोणतीही अपडेट अजूनही नाही. मात्र करुणला काहीही झालेलं नसावं, अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे. कारण चाहते करुणला मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
करुणची प्रतिक्षा आणखाी वाढणार?
करुणला टीम इंडियात तब्बल 8 वर्षांनी संधी मिळाली आहे. करुणने कसोटी कारकीर्दीतील अखेरचा सामना हा 2017 साली खेळला होता. मात्र करुणने देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कमबॅक करुन दाखवलं. मात्र आता करुणला दुखापतीमुळे आणखी प्रतिक्षा पाहायला लागू नये, एवढीच इच्छा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
करुण नायरला दुखापत!
The incident where Karun Nair got hit at the nets by a delivery from @prasidh43 @RohanDC98 #ENGvsIND #Headingley pic.twitter.com/LB7SRwa7Wu
— Subham Kumar (@SubhamKuma51092) June 19, 2025
इंग्लंड लायन्स विरुद्ध 3 डावात 259 धावा
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचेस खेळवण्यात आल्या. करुणने या दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली. करुणने 2 सामन्यांमधील 3 डावांमध्ये 259 धावा केल्या. करुण नायर याने या दरम्यान धमाकेदार द्विशतक झळकावलं. त्यामुळे करुणला प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात होतं. मात्र दुखापतीच्या वृत्तामुळे करुणला मुकावं लागण्याची चर्चाही रंगली आहे. अशात करुणला दुर्देवाने बाहेर व्हावं लागलं तर अभिमन्यू इश्वरन याला संधी मिळू शकते.
