झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने रचले इतके सारे विक्रम, जाणून घ्या सर्वकाही

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारत आणि झिम्बाब्वे हे संंघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 72 धावांनी पराभूत केलं आणि उपांत्य फेरीचं गणित सोपं केलं आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने रचले इतके सारे विक्रम, जाणून घ्या सर्वकाही
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने रचले इतके सारे विक्रम, जाणून घ्या सर्वकाही
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 10:51 PM

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुपर 8 फेरीतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण झिम्बाब्वेचा संघ या सामन्यात 184 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताने हा सामना 72 धावांनी जिंकला आहे. आता भारताला उपांत्य फेरी गाठायची तर वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. हा सामना जिंकला तर भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघासाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे.  दरम्यान, भारताने झिम्बाब्वेला 72 धावांनी पराभूत केलं आणि काही विक्रम आपल्या नावावर केले आहे. या सामन्यात काय काय केलं ते जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कमी निर्धाव चेंडू खेळण्याचा विक्रम भारताने रचला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध फलंदाजी करताना भारताने 26 चेंडू निर्धाव घालवले. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दक्षिण अफ्रिकेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दक्षिण अफ्रिकेने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध वानखेडेवर 26 चेंडू निर्धाव घालवले होते.

भारताने आपल्या डावात 17 षटकार मारले आहेत. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 15 षटकार मारले होते. इतकंच काय तर एका स्पर्धेत आतापर्यंत भारताने 63 षटकार मारले आहेत. यापूर्वी भारताने 2024 वर्ल्डकप स्पर्धेत 61 षटकार मारले होते. या यादीत वेस्ट इंडिज आघाडीवर असून त्यांनी 66 षटकार मारले आहेत. भारत झिम्बाब्वे सामन्यात एकूण 28 षटकार मारले गेले. झिम्बाब्वेकडून 11 षटकारांची नोंद झाली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या सहा फलंदाजांनी 150 हून अधिक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तसेच पहिल्यांदाच पहिल्या सहा फलंदाजांनी 20च्या वर धावा केल्या आहेत.

हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी 31 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या आहेत. यावेळी रन रनरेट हा 16.25चा होता. यापूर्वी टी20 वर्ल्डकप 2007 स्पर्धेत जयसूर्या आणि जयवर्धने यांनी 29 चेंडूत 87 धावा केल्या होत्या.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासा दोन्ही संघांची मिळून दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या झाली आहे. भारताने 256 आणि झिम्बाब्वेने 184 धावा केल्या. या दोन्ही संघाची एकूण 440 झाली आहे. यापूर्वी टी20 वर्ल्डकप 2016 मध्ये दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड सामन्यात 459 धावसंख्या झाली होती.

शिवम दुबेने दोन षटकात 46 धावा दिल्या. हे टी20 विश्वचषक सामन्यात पहिल्या दोन षटकांमध्ये गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us