AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India ने असं कोरलं 5 वेळा आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव

Team India आज जगातील सर्वात मजबूत संघापैकी एक आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. टीम इंडियाचा दबदबा जगात कसा वाढला. जाणून घ्या हा प्रवास.

Team India ने असं कोरलं 5 वेळा आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव
| Updated on: Aug 30, 2023 | 5:21 PM
Share

Team India : भारतात क्रिकेट हा सर्वाधिक पाहिला जाणार आणि खेळला जाणारा क्रीडा प्रकार आहे. जगभरात देखील क्रिकेट हा लोकप्रिय आहे. भारतीय संघ क्रिकेटमध्ये सर्वात मजबूत संघापैकी एक मानला जातो. हा खेळ इंग्रजांच्या काळापासून सुरु झाला. 1877 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात पहिली कसोटी झाली होती. त्यानंतर मग आज अनेक देश क्रिकेटमध्ये खेळत आहेत.

1975 मध्ये वाढती लोकप्रियता बघता विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना खेळल्यानंतर एक वर्षाने विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. आयसीसीने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक आणि 2021 मध्ये कसोटी विश्वचषकही सुरू केला. याशिवाय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करते जी मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाते.

आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. भारताने आतापर्यंत 5 आयसीसीचे मोठे सामने जिंकले आहेत. भारताने 2013 मध्ये शेवटची आयसीसी कप जिंकला होता. त्यानंतर 10 वर्षे उलटून गेली आहेत पण भारताने अजून आयसीसीचा कोणतीही मोठी ट्रॉफी जिंकलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे विदेशी कोचच्या नेतृत्वात खेळत असतानाच भारताने आयसीसीच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत.

1983 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात भारताने प्रथमच जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कमकुवत समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने 1975 आणि 1979 मध्ये सलग दोनदा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या तत्कालीन महाकाय वेस्ट इंडिजचा पराभव करून जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवली होती.

कपिल देवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळली होती. पण तुम्हाला माहित आहे का या संघाचे प्रशिक्षक कोण होते? 1983 मध्ये संघात प्रशिक्षक नसून एक व्यवस्थापक असायचा, जो खेळाडूंना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवायचा. 1983 मध्ये टीम इंडियाचे मॅनेजर पीआर मान सिंह होते. पीआर मान सिंग हैदराबादकडून ५ रणजी सामने खेळले. 1978 मध्ये त्यांना प्रथमच पाकिस्तान दौर्‍यावर गेलेल्या टीम इंडियाचे सहाय्यक व्यवस्थापक बनवण्यात आले.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2002 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली. पावसामुळे अंतिम सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. भारतासोबतच श्रीलंकेलाही विजयी करण्यात आले. या प्रवासात टीम इंडियाच्या खेळाडूंसोबतच संघाचे प्रशिक्षक जॉन राइट यांचेही मोठे योगदान होते.

ICC ने 2007 मध्ये पहिल्यांदा टी२० फॉरमॅट सुरु करत विश्वकपचे आयोजन केले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना रंगला. त्यावेळी भारताने इतिहास रचला. यावेळी टीम इंडियाचे कोच लालचंद राजपूत (Lalchand Rajput) होते.

परदेशी प्रशिक्षकांचा फॉर्म्युला भारतीय संघासाठी चांगला राहिला आहे. जॉन राइटने प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियाला मजबूत बनवले आणि 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले, तर 2011 मध्ये परदेशी प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या जेतेपदाच्या विजयात टीम इंडियाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे भारत दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेटचा चॅम्पियन बनला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.