टीम इंडियापासून दूर होण्यापूर्वीच प्रशिक्षक भावूक, इमोशनल पोस्ट लिहीत व्यक्त केल्या भावना

टी 20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार असून प्रशिक्षकतर बदलणारचं आहेत. सोबतच टी20 संघाचा कर्णधारही बदलणार आहे. विराटने स्वत: याबाबत माहिती दिली होती.

टीम इंडियापासून दूर होण्यापूर्वीच प्रशिक्षक भावूक, इमोशनल पोस्ट लिहीत व्यक्त केल्या भावना
आर श्रीधर धोनीसह

मुंबई: पुढील काही महिन्यांत भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) अनेक बदल होणार आहेत. यात सर्वात मोठा बदल म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलणार असून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह (Ravi Shastri) इतर कोचिंग स्टाफही बदलणार आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) हा देखील टी20 कर्णधारपद सोडणार आहे. दरम्यान शास्त्रींसह कोचिंग स्टाफमध्ये फिल्डिंग कोच असणारे आर. श्रीधर (Coach R Sridhar) हे देखील पदावरुन पायउतार होणार असल्याने त्यांनी संघापासून वेगळं होण्याआधी एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

श्रीधर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर लिहिलेल्या भल्यामोठ्या पोस्टमध्ये सर्वांचे आभार मानत त्यांच प्रशिक्षक म्हणूनचा कार्यकाळ शब्दात रेखाटला आहे. श्रीधर हे 2014 साली भारतीय संघासोबत फिल्डिंग कोच म्हणून जॉईन झाले. तेव्हापासून आतापर्यंत ते संघासोबत असून सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रींसोबतच ते देखील संघाला राम राम करणार आहेत.

श्रीधर यांनी भावनिक पोस्ट

श्रीधर यांनी त्यांच्या भावनिक पोस्टमध्ये स्वत:चा मैदानावरील फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘2014 ते 2021  या काळात संघाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल BCCI चं धन्यवाद. मी संपूर्ण मेहनतीने माझं काम केलं आहे. यावेळी माझ्याकडून काही चूका झाल्याही असतील तरी आज संघ एका चांगल्या स्थानावर विराजमान आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by R Sridhar (@coach_rsridhar)

पुढे त्यांनी अनेकांचे आभार मानले यात रवी शास्त्रींचे आभार मानाता ‘मी कायम त्यांचा ऋणी राहिन.’ असंही त्यांनी लिहिलं. तर दोन्ही कर्णधार धोनी आणि विराट कोहली यांचही खूप-खूप धन्यवाद. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. असंही त्यांनी लिहिलं सोबतच अजिंक्य रहाणे, रोहित शर्मासह यांच्यासह सर्व खेळाडू  अनिल कुंबळे, संजय बांगर, विक्रम राठोर, भरत अरुण इत्यांदीचंही धन्यवाद या पोस्टमध्ये श्रीधर यांनी केलं आहे.

 

हे ही वाचा

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो

(Team India Fielding Coach r sridhar writes emotional note before resigning from Coaching)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI