
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे मालिका खेळणार आहे. त्याच्या नेतृत्वात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील. 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ 15 ऑक्टोबरला दिल्ली विमानतळावरून रवाना झाला होता. पण ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी टीम इंडियाला 4 तास उशीर झाला. त्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर मानसिक थकवा स्पष्ट दिसत होता. पण उशीर होण्याचं कारण काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्याचं कारण आता समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, टीम इंडियाचं विमानाने दिल्ली एअरपोर्टवरून चार उशिराने भरारी घेतली. त्यामुळे सिंगापूरच्या उड्डाणाची वेळही बदलावी लागली. खरं तर टीम इंडियाचे खेळाडू रात्री 12 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं. पण 16 ऑक्टोबरला सकाळी 4 वाजता पर्थला पोहोचले.
दिल्लीहून पर्थला टीम इंडियाची पहिली बॅच रवाना झाली. या बॅटमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुबमन गिल,केएल राहुल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, हार्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू होते. रिपोर्टनुसार, भारतीय संघाचं विमान पर्थमध्ये उतरताच कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढलं आणि हॉटेलच्या बसमध्ये बसवलं. या दरम्यान, काही भारतीय चाहते खेळाडूंची वाट पाहात होते. दुसरीकडे, या प्रवासातील थकवा खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 16 ऑक्टोबरचा दिवस हा आराम करण्यात जाणार आहे. खरं तर पहिल्या वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला तयारीसाठी फक्त दोन दिवस आहेत.
FIRST PICTURES: Of Team India 🇮🇳 arriving in Perth in the early hours of this morning. #AUSvIND pic.twitter.com/q7sAsH5zFc
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) October 16, 2025
ROHIT SHARMA IN PERTH AUSTRALIA.🇮🇳🔥 pic.twitter.com/6RnReMhNWp
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 15, 2025
पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे. रिपोर्टनुसार, या सामन्यापूर्वी 17 आणि 18 ऑक्टोबरला भारतीय खेळाडू सराव शिबिरात भाग घेतली. या दोन दिवसात भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी जुळवून घ्यायचं आहे. दुसरा वनडे सामना 23 ऑक्टोबर आणि तिसरा वनडे सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे. या वनडे मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळपास सात महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे.