ICC Test Ranking | टीम इंडियाची सलग 5 वर्ष बादशाहत कायम, आयसीसीच्या वार्षिक क्रमवारीत विराट सेना अव्वलस्थानी

टीम इंडियाने (Team India) आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये (icc test ranking) सलग 5 वर्षांपासून अव्वल स्थान कायम (1st positon)राखलं आहे. विराटसेनेनं मागील 6 महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा कसोटी मालिकेत धुव्वा उडवला होता.

ICC Test Ranking | टीम इंडियाची सलग 5 वर्ष बादशाहत कायम, आयसीसीच्या वार्षिक क्रमवारीत विराट सेना अव्वलस्थानी
team india

दुबई : आयसीसीने नुकतेच टेस्ट रॅकिंग(Icc Test Ranking) जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाने (Team India) आपली बादशाहत कायम राखली आहे. विशेष म्हणजे विराटसेनेने गेल्या 5 वर्षांपासून अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला (England) कसोटीत धूळ चारली. तर ऑस्ट्रेलियाला (Australia) त्यांच्याच भूमित धुव्वा उडवला होता. टीम इंडियाने इंग्लंडचा 3-1 तर ऑस्ट्रेलियाला 2-1 च्या फरकाने पराभूत केलं होतं. या कामगिरीचा फायदा टीम इंडियाला क्रमवारीत झाला आहे. (team india retain constantly 5th year 1st positon in icc test ranking in annual ranking)

टीम इंडिया अव्वलस्थानी

टीम इंडिया 121 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी राहिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडची टीम आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये अवघ्या 1 रेटिंग पॉइंटचा फरक आहे. न्यूझीलंडच्या नावे 120 पॉइंट्स आहेत. न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव केला होता.

इंग्लंडची झेप तर ऑस्ट्रेलियाची घसरण

या क्रमवारीत इंग्लंडला एका स्थानाचा फायदा तर ऑस्ट्रेलियाची घसरण झाली आहे. इंग्लंडने चौथ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंडच्या नावे 109 तर ऑस्ट्रेलियाकडे 108 पॉइंट्स आहेत. तर पाकिस्तान 5 व्या स्थानी कायम आहे.

वेस्टइंडिजचा टॉप 6 मध्ये प्रवेश

या क्रमवारीत विंडिजला चांगलाच फायदा झाला आहे. विंडिजला 2 स्थानांचा लाभ झाला आहे. विंडिजने 8 व्या क्रमांकावरुन थेट 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विंडिजने यावर्षी बांगलादेशचा 2-0 ने पराभव केला होता. तर श्रीलंके विरुद्ध मालिका ड्रॉ केली होती. विंडिजच्या नावे एकूण 84 पॉइंट्स आहेत. विंडिजने 2013 नंतर पहिल्यांदा टॉप 6 मध्ये प्रवेश केला आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला 1 स्थानाने घसरण झाली आहे.

संबंधित बातम्या :

Yuzvendra Chahal | महेंद्रसिंह धोनीनंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण

(team india retain constantly 5th year 1st positon in icc test ranking in annual ranking)

Published On - 5:24 pm, Thu, 13 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI