AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावरून सुनील गावसकर यांचा संताप, स्पष्टच म्हणाले की…

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या मालिकेत टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटला खडे बोल सुनावले आहेत.

Team India : रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावरून सुनील गावसकर यांचा संताप, स्पष्टच म्हणाले की...
रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावरून सुनील गावस्कर यांचा संताप, स्पष्टच म्हणाले की...
| Updated on: Jul 10, 2023 | 5:22 PM
Share

मुंबई : आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाकडून पराभवाची मालिका सुरुच आहे. गेल्या दहा वर्षात भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. महेंद्रसिंह धोनीनंतर टीम इंडियाच्या वाटेला आयसीसी चषकांचा दुष्काळ आहे. विराट कोहलीही जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. त्यानंतर विराट कोहलीने तिन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं आणि ही माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली. रोहित शर्मा आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करेल अशी अपेक्षा होती. मात्र टी 20 वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे आता त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वनडे वर्ल्डकप तोंडावर असताना आता लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी रोहित शर्मा याच्यासह टीम मॅनेजमेंटवर राग व्यक्त केला आहे.

सुनील गावसकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “मला रोहितकडून खूप अपेक्षा आहेत. भारतात खेळणं वेगळी गोष्ट आहे. पण परदेशात चांगलं खेळणं तुम्ही ग्रेट असल्याचं सिद्ध करतं. तुमच्या प्रदर्शनाने निराश केलं आहे. इतकंच काय तर टी20 मध्ये चांगले खेळाडू आणि चांगला अनुभव असतानाही अंतिम फेरी गाठू शकले नाहीत. हे खूपच निराशाजनक आहे.”

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पराभव सुनील गावसकर यांच्या जिव्हारी लागला आहे. निवडकर्ते आणि बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत घेतलेल्या निर्णयाबाबत विचारलं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामागे त्यांनी काय विचार केला होता? याबाबत कारण मीमंसा व्हायला हवी होती, असं त्यांनी पुढे सांगितलं.

“नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण का निवडलं? ट्रेव्हिस हेडला बाद करण्यासाठी शॉर्ट बॉल टाकावं हे माहिती नव्हतं का? त्याच्या 80 धावा झाल्यानंतर शॉर्ट बॉल टाकायची उपरती झाली. पण फलंदाजी आला तेव्हाच रिकी पॉटिंगने शॉर्ट बॉलबाबत कल्पना दिली होती. सर्वांना माहिती होतं पण तुम्ही रणनिती आखली नाही”, असं सुनील गावसकर यांनी सांगितलं.

रोहित शर्मा याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला तयार होण्यासाठी कमी वेळ मिळाल्याचं कारण दिलं होतं. या कारणावरून सुनील गावसकर चांगलेच भडकले असून खडे बोल सुनावले आहेत. “आपण कोणत्या तयारीबाबत विचारत आहात? जेव्हा तुम्ही असं बोलता तेव्हा गंभीर असणं गरजेचं आहे. तुम्ही स्वत: 15 दिवसांपूर्वी येऊन सराव करायला पाहीजे होता. प्रमुख खेळाडू आराम केला असता आणि रिझर्व्ह किंवा बाकी खेळाडू खेळले असते. पण असं होत नाही. “

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.