क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त, जर्मनीत होणार शस्त्रक्रिया

Suryakumar Yadav Surgery : क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव याच्याबाबत अपडेट असून त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली जाणार आहे. नेमकं काय झालंय त्याला जाणून घ्या.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव 'या' आजाराने ग्रस्त, जर्मनीत होणार शस्त्रक्रिया
suryakumar hernia operation
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 1:10 PM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टी-20 क्रिकेटचा बादशहा असलेल्या सुर्यकुमार यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सुर्यकुमार यादव याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तीन दिवसांनी सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धचा मालिकेसाठीही तो उपलब्ध नाही. आधीच दुखापत असताना सुर्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झालीये. सुर्या एका आजाराने ग्रस्त असून यावर उपचार घेण्यासाठी तो परदेशी जाणार असल्याची माहिती समजत आहे. टीम इंडियाला वर्ल्डकप आणि आयपीएल तोंडावर असताना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

सुर्याला नेमकं काय झालंय?

सुर्यकुमार यादव याला हर्नियाचं निदान झाल्याची माहिती समजत आहे.  सुर्या आता बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. हर्निया आजारावर उपचार घेण्यासाठी सुर्या जर्मनीमधील म्युनिक येथे जाणार आहे. सुर्यकुमार यादव याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हर होण्यासाठी वेळ लागणार आहे. याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सुर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएलमध्येही खेळताना दिसण्याची कमीच शक्यता आहे. आयपीएल न खेळल्यामुळे सूर्याचं वर्ल्ड कपमधील संघातील जागेवर प्रश्नचिन्ह आहे.

सुर्यकुमार जगात एक नंबरचा बॅट्समन

सुर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमधील जगातील  नंबर वनचा फलंदाज आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. कारण सुर्या टी-2O क्रिकेटमधील हुकमी एक्का आहे. गडी एकदा  सेट झाल्यावर भल्याभल्या गौलंदाजांना नांगी टाकायला भाग पाडतो. आता झालेल्या आफ्रिका दौऱ्यावर सुर्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.