Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया Champions Trophy 2025 साठी केव्हा रवाना होणार? जाणून घ्या

Icc Chamopions Trophy 2025 Prize Money : पाकिस्तान क्रिकेट टीम गतविजेता आहे. पाकिस्तानला 2017 मध्ये 14 कोटी रुपये बक्षिस रक्कम म्हणून देण्यात आली होती. यंदा किती मिळणार? टीम इंडिया दुबईसाठी केव्हा निघणार?

टीम इंडिया Champions Trophy 2025 साठी केव्हा रवाना होणार? जाणून घ्या
Icc Chamopions Trophy 2025 Prize MoneyImage Credit source: Andrew Matthews/PA Images via Getty Images
Follow us
| Updated on: Feb 12, 2025 | 12:03 PM

टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी मायदेशात इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. तर टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडला क्लिन स्वीप करण्याचा मानस असणार आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा बुधवारी 12 फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया त्या सामन्यानंतर थेट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासन सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे असल्याने टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत होणार आहे. टीम इंडिया दुबईला केव्हा रवाना होणार? याबाबत आपण जाणून घेऊयात

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेतील पहिला सामना हा 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडिया 15 फेब्रुवारीला दुबईला रवाना होणार आहे. त्याआधी पत्रकार परिषद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीआधी एकही सराव सामना खेळणार नाही. तर इतर उर्वरित 7 संघांना प्रत्येकी 2-2 सराव सामने खेळायचे आहेत.

प्राईज मनी किती?

आता विषय पैशांचा. चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता संघाला प्राईज मनी म्हणून किती रक्कम मिळणार? याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांनुसार, विजयी संघाला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळणार? याबाबतची घोषणा ही 12 फेब्रुवारीला केली जाऊ शकते. पाकिस्तानने गेल्या वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तेव्हा पाकिस्तानला 14.11 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले होते. तर उपविजेत्या संघाला 7 कोटी रुपेय देण्यात आले होते.

1 ट्रॉफी, 2 गट, 8 संघ आणि 15 सामने

दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड ए ग्रुपमध्ये आहेत. तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान,दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड बी ग्रुपमध्ये आहे. टीम इंडिया या मोहिमेतील पहिला सामना बांगलादेश, दुसरा सामना पाकिस्तान तर तिसरा आणि अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.

टीम इंडियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक

इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई

इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.