चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज, आयसीसीकडून मिळाली अशी बातमी
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. सलग दोन सामने जिंकून आधीच भारताने मालिका खिशात घातली आहे. टीम इंडिया या मालिकेनंतर थेट दुबईला रवाना होणार आहे. यापूर्वी आयसीसीकडून टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे.

टीम इंडिया पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतली आहे. वनडे आणि कसोटी टीम इंडियाची मागच्या काही मालिकांमध्ये पिछेहाट झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला सूर गवसणं महत्त्वाचं होतं. असं असताना भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीत फायदा होणार यात काही शंका नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरा सामना अजून बाकी आहे. हा सामना भारताने आपल्या खिशात घातला तर इंग्लंडला वनडे मालिकेत व्हाईटवॉश मिळेल. तत्पूर्वी आयसीसीकडून टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर अूसन 119 रेटिंग झालं आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी असून रेटिंग 113 झाली आहे. तसं पाहिलं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रेटिंगमध्ये बराच फरक आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून आणखी पुढे जाण्याची संधी आहे.
भारताने इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना जिंकला तर रेटिंग 119 वरून थेट 120 वर जाईल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील रेटिंगमधील फरक 1 अंकाने वाढेल. जर भारताने तिसरा सामना गमावला तर रेटिंग 1 अंकाने कमी होईल आणइ 118 होईल. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपू्र्वी टीम इंडिया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असणार हे निश्चित आहे. यामुळे टीम इंडियाचं मनोबल वाढेल आणि त्याचा फायदा चॅम्पियन्स ट्रॉफीत होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉर्मेटमध्ये आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली पहिली आयसीसी ट्रॉफी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण आठ संघ सहभागी आहेत. भारत, बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ एका गटात आहेत. भारताला उपांत्य फेरीसाठी तीन पैकी दोन सामने जिंकणं भाग आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि 3 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध सामना आहे. भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. भारताने उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठली तर हे दोन्ही सामने दुबईतच होतील.
