टेक्नोलॉजिया…! स्वीप शॉट खेळण्याचं खेळाडूने दाखवलं नवं तंत्र, गोलंदाजही झाला हैराण Watch Video
इंग्लंड काउंटी क्रिकेट क्लब ग्लॅमॉर्गनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका खेळाडूने स्वीप शॉट मारण्यासाठी नव्या तंत्राचा वापर केला. या फलंदाजाने बॅकफूटवर स्वीप शॉट खेळला. त्यामुळे गोलंदाजही आवाक् झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक भन्नाट शॉट्स खेळताना आपण फलंदाजांना पाहीलं आहे. कोणाचा सुपला शॉट, तर कोणाचा पूल शॉट मारण्यात हातखंडा आहे. कोणी कव्हर ड्राईव्ह तर कोणी स्ट्रेट ड्राईव्ह मारण्यात मास्टरकी केली आहे. त्यामुळे अशा शॉट्सची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा ते ते खेळाडू समोर येतात. सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह, रोहित शर्माचा पूल, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, सूर्यकुमार यादवचा सुपला शॉट अशी काही उदाहरणं आहेत. पण क्रिकेटमध्ये आता एका नव्या शॉट्सचा उगम झाला आहे. हा शॉट्स मारण्याची पद्धत पाहून गोलंदाजही आवाक् झाला आहे. कारण फलंदाजाने एकदा नाही तर वारंवार असे शॉट्स खेळून त्या शॉटवर हातखंडा असल्याचं दाखवून दिलं आहे. इंग्लंड काउंटी क्रिकेट क्लब ग्लॅमॉर्गन क्रिकेट आणि केंट यांच्यातील सामन्यादरम्यान हा खास शॉट पाहायाला मिळाला. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. यात एक खेळाडू बॅक-फूटवर स्वीप शॉट खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत आहे.
स्वीप शॉट खेळण्याची नवी पद्धत
ग्लॅमॉर्गनने व्हिडिओ शेअर केला आणि पोस्ट केले की स्वीप शॉट खेळण्यासाठी ही एक नवीन तंत्र आहे. कारण, सहसा कोणताही फलंदाज स्वीप शॉट किंवा रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी पुढच्या पायाचा वापर करतो. फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यासाठी फलंदाज अशा प्रकारे पुढे झुकतात. पण या व्हिडिओमध्ये दिसत असलेला फलंदाज बॅकफूटवर जातो आणि पाठचा पाय पुढे टाकतो. तसेच स्वी शॉटसाठी बॅट फिरवत होता. फलंदाज अचूकपणे चेंडूवर प्रहार करत होता. त्यामुळे चेंडू वेगाने स्क्वेअर-लेगच्या सीमारेषेकडे गेला. फलंदाजाने हा शॉट शोधून काढला की त्याने अचानक त्या क्षणी खेळला हे स्पष्ट झालेले नाही. पण हा शॉट क्रिकेटरसिकांना प्रभावित करत आहे.
View this post on Instagram
काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ग्लॅमॉर्ग आणि केन्ट हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून केंटने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण ग्लॅमॉर्गने पहिल्या डावात 549 धावा करत डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करणं काही केंट संघाला जमलं नाही. केंटचा पहिला डाव 212 धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात ते 176 धावांवर सर्वबाद झाले. केंटचा या सामन्यात एक डाव आणि 161 धावांनी पराभव झाला. या सामन्यात बेन केल्लावेने 228 चेंडूत 18 चौकार आणि 3 षटकार मारत नाबाद 181 धावांची खेळी केली.
