AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 : विश्वास तरी कुणावर ठेवावा! पोस्टमास्टरनं 24 कुटुंबियांचे पैसे लावले सट्टेबाजारी

पोस्टरमास्टरवर लोकांनी विश्वास ठेवला. मात्र, हाच विश्वास त्यांना चांगलाच महागात पडलाय.

IPL 2022 : विश्वास तरी कुणावर ठेवावा! पोस्टमास्टरनं 24 कुटुंबियांचे पैसे लावले सट्टेबाजारी
आयपीएलमध्ये सट्टेबाजार?Image Credit source: social
| Updated on: May 25, 2022 | 1:32 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये यापूर्वी एक सट्टेबाजीचं (Betting) वृत्त पाकिस्तानमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे समोर आलं होतं. यानंतर आता पुन्हा एक वृत्त हाती आलं असून एका पोस्टमास्टरनं (postmaster) तब्बल एक कोटी रुपये गमावले आहेत. या पोस्टमास्टरनं सट्टेबाजीसाठी तब्बल 24 कुटुंबांची एक कोटी रुपायांची बचत पणाला लावल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे अशा प्रलोभनांना बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. विशेष म्हणजे पोस्टरमास्टरवर लोकांनी विश्वास ठेवला. मात्र, हाच विश्वास त्यांना चांगलाच महागात पडलाय. हा सट्टेबाजार मध्य प्रदेशातील एका पोस्टमास्टरने केला आहे. एक कोटी रुपये पोस्टमास्टरने गमावल्याने तब्बल 24 कुटुंबियांना याचा फटका सहन करावा लागतोय.

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील सब पोस्ट ऑफिसमध्ये 24 कुटुंबांना मुदत ठेवीचे पैसे जमा करायचे होते. पोलिसांनी सांगतिलेल्या माहितीनुसार, या पोस्टमास्टरने या पैशांचा सट्टा खेळला. बीना सब पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर विशाल अहिरवार यांना बीना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांसमोर पोस्टमास्टरने गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगण्यात येत आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांना सांगितलं की, पोस्टमास्टरने बनावट एफडी खात्यांसाठी खरे पासबुक जारी केले होते. मागील दोन वर्षांपासून सर्व पैसे आयपीएल क्रिकेट सट्ट्यांमध्ये गुंतवले. बीना जीआरपी स्टेशन प्रभारी अजय धुर्वे यांनी ही माहिती दिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे लाखे रुपये बुडल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

अनेक कुटुंबांचं  नुकसान

अटक करण्यात आलेल्या सब पोस्टमास्टर विशाल अहिरवारवर आता कलम 420 आयपीसी आणि 408 आयपीसी अंतर्गत आरोपांवरुन त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यातील एका तक्रारदार महिलेनं सांगतिलं की, मी कोरोनामुळे पती आणि सासरे गमावले आहेत. माझ्या पतीने मृत्यूपूर्वी नऊ लाख रुपये जमा केले होते. परंतु मला नुकतेच विशाल अहिरवारच्या फसवणुकीची माहिती मिळाली आहे. यानंतर मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले. तिथं मला सांगण्यात आलं की मुदत ठेव खाते क्रमांक अस्तित्वात नाही. माझे पती आणि सासरे आता हयात नाहीत. मला आता काय करावं हे समजत नाहीये.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.