IND vs SA: वनडे मालिकेच्या निर्णायक सामन्यासाठी टीम इंडियामध्ये दोन बदल होण्याची शक्यता, जाणून घ्या
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये होणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताने 349 धावा केल्या. पण भारताला फक्त 17 धावांनी विजय मिळाला. असं असताना दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी संघात बदल होण्याची शक्यता आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा वनडे सामना हा निर्णायक ठरणार आहे. दक्षिण अफ्रिकेला मालिका वाचवण्यासाठी आणि भारताला मालिका जिंकण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. दुसरा वनडे सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला काही उणीवा दूर करणं भाग आहे. कारण पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली होती. तर फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याने भारताला 349 धावांपर्यंत मजल मारता आली. इतक्या धावा झाल्या नसत्या तर हा विजय काही सोप नव्हता. कारण दक्षिण अफ्रिकेने सुरुवातीला 3 विकेट गमवूनही 332 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात काय बदल होऊ शकतात ते…
पहिल्या वनडे सामन्यात यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे या तिघांपैकी एकाचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. जर आपण प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याचं ठरलं तर आपण जयस्वालला बाहेर ठेवून ऋतुराजला सलामीवीर म्हणून पाठवलं जाऊ शकते. कारण ऋतुराजने सलामीवीर म्हणून जास्त यश मिळवले आहे. दुसरीकडे, मधल्या फळीत तिलक वर्माला संधी दिली जाऊ शकते. कारण त्याला मधल्या फळीत खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकाच्या स्थानासाठी त्यांना योग्य पर्याय मानले जात आहे.
कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांनी विकेट घेऊन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही हे दोघे निश्चितच खेळतील. भारत पुन्हा तीन फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नितीश रेड्डी आणि ऋषभ पंत यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल/ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
