IND vs AUS : टीम इंडियाचा 2 विकेट्सने विजय, चेन्नईत ऑस्ट्रेलियाचा पराभव
India vs Australia U19 Multiday Series : चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये झालेल्या या 4 दिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला आहे.
सोहम पटवर्धन याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने 4 दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 212 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 8 विकेट्स गमावून 61.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. निखील आणि नित्या पंड्या हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. या दोघांनी दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. नित्याने 51 धावांचं योगदान दिलं. तर निखिलने 71 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 55 रन्स केल्या. कार्तिकेय याने 35 आणि अभिग्यान कुंदु याने 23 धावांचं योगदान दिलं. तर विहान आणि कॅप्टन सोहम या दोघांनी अनुक्रमे 11 आणि 10 धावा केल्या. तर वैभव सूर्यवंशी 1 धाव करुन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून एडन ओ कॉनर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. विश्वा रामकुमारने तिघांना माघारी पाठवलं. तर थॉमस ब्राउनच्या खात्यात 1 विकेट गेली.
सामन्याचा धावता आढावा
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 71.4 षटकांमध्ये सर्वबाद 293 धावा केल्या. भारताने प्रत्युत्तरात 62.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 296 धावा करुन 3 धावांची नाममात्र आघाडी मिळवली. टीम इंडियाकडून पहिल्या डावात वैभव सूर्यवंशी याने विस्फोटक खेळी केली. वैभवने 104 धावांची खेळी केली. तर विहानने 76 धावांचं योगदान दिलं. इतर फलंदाजांना सुरुवात मिळाली, मात्र त्यांना फार योगदान देता आलं नाही.
त्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 67.4 ओव्हरमध्ये 214 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे टीम इंडियाला 212 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान टीम इंडियाने 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दरम्यान याआधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला टी20i मालिकेत क्लिन स्वीप दिला. अंडर19 टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 3-0 ने धुव्वा उडवला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यातून रिकाम्या हातानेच परतावं लागलं आहे.
भारताचा 2 विकेट्सने विजय
India U19 Won by 2 Wicket(s) #IndvsAus #U19Multiday Scorecard:https://t.co/KwncAZUlpI
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 2, 2024
अंडर 19 टीम इंडिया : सोहम पटवर्धन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान, नित्या जे पंड्या, कार्तिकेय के पी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), निखिल, मोहम्मद इनान, समर्थ एन, आदित्य सिंग आणि आदित्य रावत.
अंडर 19 ऑस्ट्रेलिया टीम : सायमन बज (कॅप्टन आणि विकेटकीपर), रिले किंगसेल, स्टीव्ह होगन, ऑली पीक, झॅक कर्टन, ख्रिश्चन हॉवे, एडिसन शेरीफ, एडन ओ कॉनर, थॉमस ब्राउन, हेडन शिलर आणि विश्व रामकुमार.