IND vs SA : कॅप्टन्सी खाऊ नाही! कर्णधार वैभव सूर्यवंशी पहिल्याच सामन्यात ढेर, किती धावा केल्या?
Vaibhav Suryavanshi U19 India vs South Africa : वैभव सूर्यवंशी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपयशी ठरला. वैभव कॅप्टन म्हणून पहिल्या डावात 11 धावांवर बाद झाला.

अंडर 19 टीम इंडियाचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने आतापर्यंत अनेक सामन्यांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वैभवने 2025 वर्षात आयपीएल, लिस्ट ए क्रिकेट, यूथ वनडे, यूथ टेस्ट, विजय हजारे ट्रॉफी या सर्व प्रकारात आपली छाप सोडली. अंडर 19 टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (U19 Team India Tour Of South Africa 2026) आहे. टीम इंडिया या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. वैभवने 3 जानेवारीला पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण केलं. मात्र वैभव कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. वैभवने या सामन्यात किती धावा केल्या? हे जाणून घेऊयात.
अंडर 19 टीम इंडियाचा 2025 वर्षातील पहिलाच सामना होता. त्यामुळे वैभवकडे कॅप्टन म्हणून डेब्यू करताना आणि नवीन वर्षातील पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी करण्याची संधी होती. मात्र वैभव कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. नेतृत्वासह फलंदाजी अशी दुहेरी भूमिका पार पाडणं खेळाडूसाठी आव्हानात्मक असतं. वैभव हे आव्हान पेलण्यात अपयशी ठरला.
वैभव सूर्यवंशीकडून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
आयुष म्हात्रे अंडर 19 टीम इंडियाचा नियमित कर्णधार आहे. मात्र आयुषला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे वैभवला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय. वैभवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात टॉससाठी मैदानात उतरताच इतिहास घडवला. वैभव सर्वात कमी वयात नेतृत्व करणारा युवा खेळाडू ठरला. वैभवने याबाबत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाकडून वैभवसह एरॉन जॉर्ज मैदानात आला. एरॉन जॉर्ज 5 धावांवर आऊट झाला. वैभव सूर्यवंशी याला कॅप्टन म्हणून मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र वैभव नवीन वर्षात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. वैभवला 20 पार पोहचता आलं नाही. वैभवने 12 बॉलमध्ये 2 फोरसह 11 रन्स केल्या. यासह वैभवच्या कॅप्टन म्हणून पहिल्या खेळीचा शेवट झाला.
अंडर 19 टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा
दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मालिकेत एकूण 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने विलोमूर पार्क, बेनोनी इथे आयोजित करण्यात आले आहेत.
