AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC U19 World Cup: युगांडावरील मोठ्या विजयानंतर क्वार्टर फायनलमध्ये भारत बांगलादेशला भिडणार

अंगकृष रघुवंशीने (144) धावा केल्या, तर राज बावाने 108 चेंडूत नाबाद (162) धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता.

ICC U19 World Cup: युगांडावरील मोठ्या विजयानंतर क्वार्टर फायनलमध्ये भारत बांगलादेशला भिडणार
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 11:43 AM
Share

गयाना: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत अंगकृष रघुवंशी (Angkrish Raghuwanshi) आणि राज बावा (Raj Bawa) यांच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने दुबळया युगांडावर 326 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. ग्रुप बी मध्ये भारताने आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. भारत गटात टॉपवर आहे. आधी दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी त्यानंतर आयर्लंडवर 174 धावांनी विजय मिळवला होता.

अंगकृष रघुवंशीने (144) धावा केल्या, तर राज बावाने 108 चेंडूत नाबाद (162) धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. भारताने निर्धारीत 50 षटकात पाच बाद 405 धावांचा डोंगर रचला. अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा हा दुसरा सर्वोच्च स्कोर आहे. यापूर्वी भारताने 2004 च्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 425 धावांचा डोंगर उभारला होता.

युगांडाच्या पाच फलंदाजांनी भोपळाही नाही फोडला भारताने दिलेल्या विशाला लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा डाव अवघ्या 79 धावात आटोपला. त्यांचे पाच फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले. दोघांनीच फक्त दोन आकडी धावा केल्या. यात कॅप्टन पास्कलने सर्वाधिक (34) धावा केल्या. फलंदाजीत विशेष चमक न दाखवू शकलेल्या कॅप्टन निशांत सिंधूने गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या. अन्य गोलंजदाजांनी त्याला चांगली साथ दिली. अवघ्या 20 षटकात युगांडाचा डाव आटोपला.

क्वार्टरफायनलमध्ये भारताचा सामना 29 जानेवारीला बांगलादेश विरुद्ध होणार आहे. कोरोनाग्रस्त असलेला कॅप्टन यश धुल तो पर्यंत खेळण्यासाठी फिट होईल.

U19 World Cup India hammer Uganda by 326 runs to face Bangladesh in quarter-finals

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.