Anrich Nortje on Umran Malik :…जेव्हा उमरानचं कौतुक होतं, अ‍ॅनरिककडून मलिकवर स्तुतीसुमने, कारण काय जाणून घ्या…

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अ‍ॅनरिक नॉर्टजे यानं उमरान मलिकचं तोंडभरुन कौतुक केलंय.

Anrich Nortje on Umran Malik :...जेव्हा उमरानचं कौतुक होतं, अ‍ॅनरिककडून मलिकवर स्तुतीसुमने, कारण काय जाणून घ्या…
Umaran malik
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

|

Jun 17, 2022 | 9:41 AM

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रात खेळाडू त्यांच्या कामगिरीवरुन ओळखले जातात. त्यांची सामन्यातील चमक त्यांना नवी ओळख देत असते. भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी केलेल्या कौतुकाची अनेक उदहारण देता येतील. कारण, कामगिरी बहारदार असली की तुम्ही कौतुकास पात्र होतात. तुमची कामाच्या जोरावर जगभर ख्याती होते. अशातच दक्षिण आफ्रिकेचा (SA) वेगवान गोलंदाज अ‍ॅनरिक नॉर्टजे (Anrich Nortje) यानं उमरान मलिकचं (Umran Malik) तोंडभरुन कौतुक केलंय. अ‍ॅनरिक याला वाटतं की तो अजूनही त्याची जुनी लय पूर्णपणे परत मिळवण्यापासून दूर आहे. मांडीच्या दुखापतीमुळे तो पाच महिनं क्रिकेटपासून दूर होता. आता तो दक्षिण आफ्रिकेच्या संघात परतला आहे. आयपीएल 2022च्या आधी अशी बातमी आली होती की नॉर्टजे दुखापत आता कमी झाली आहे. त्यानंतर त्याला दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची परवानगी देण्यात आली. तो दिल्लीचा तिसरा सामना खेळला पण त्यानंतर पुढचा सामना खेळण्यासाठी त्याला महिनाभर वाट पाहावी लागली. त्यानं सहा सामन्यांत 9.71 रनरेटच्या धावा देत नऊ बळी घेतले.भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत तीन विकेट्स घेतल्या आहेत.

दिग्गज क्रिकेटपटूंना नेहमी इतर खेळाडूंविषयी विचारलं जातं. सौरव गांगुली हे देखील खेळाडूंविषयी बोलतात. त्यांनी काय करायला पाहिजे हे देखील सांगतात. यात आता दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अ‍ॅनरिक याला देखील असेच काही प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यानं सविस्तर भाष्य केलंय. तर उमरान मलिकविषयी देखील तो बोलला आहे.

अ‍ॅनरिक याला त्याच्याविषयी बोलण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, नाही, मी अजूनही वर्कआउट करत आहे. शारीरिकदृष्ट्या मी आता माझ्या अपेक्षांच्या 100 टक्के आहे. मी तंदुरुस्त नाही आणि मी काम करत आहे. एक किंवा दोन गोष्टी करत आहे. नियमीत वर्कआउट करत असल्यानं माझी प्रकृती सुधारते आहे.’ तो पुढे म्हणाला की, ‘गोलंदाजीवरही नियंत्रण असते. तुम्ही नेहमी एका दिवसात आठ किंवा नऊ षटके टाकू शकत नाही. जरी ते आतापर्यंत चांगले आव्हान राहिलं असलं तरी.’

हे सुद्धा वाचा

अ‍ॅनरिक उमरानवर काय बोलला?

या काळात अ‍ॅनरिकनं उमरानचंही कौतुक केलंय. तो म्हणाला की, ‘उमरान हा उत्तम आणि अतिशय वेगवान गोलंदाज आहे. तो काय करू शकतो हे त्यानं दाखवून दिलंय. जर तो वेगवान गोलंदाजी करू शकला तर ते त्याच्यासाठी चांगले होईल. जर मी वेगवान असेल तर ते माझ्यासाठी चांगले आहे, असं मला वाटत नाही. त्या टप्प्यावर आम्ही सर्वात वेगवान चेंडू टाकण्यासाठी स्पर्धा करत आहोत. हे सर्व जिंकणे आणि संघासाठी योगदान देणे आहे.’

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें