नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी (Commonwealth Games) भारताचा 37 सदस्यीय ऍथलेटिक्स संघ गुरुवारी अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियानं (AFI) जाहीर केलाय. विशेष म्हणजे आता याचं नेतृत्व ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) करणार आहे. निवड समितीनं अपेक्षेप्रमाणे खेळाडूंची निवड केली असून एकाही अनपेक्षित नावाला संघात स्थान मिळालेलं नाही. AFIच्या निवड समितीनं निवडलेल्या 37 सदस्यीय संघात 18 महिला खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये स्टार धावपटू हिमा दास आणि दुती चंद यांचा समावेश आहे. यांना महिलांच्या रिले संघात स्थान देण्यात आलंय. निवड समितीनं पुरुषांच्या 4×400 मीटर रिले संघाचीही निवड केली आहे. अविनाश साबळे यानं अलीकडेच आठव्यांदा आपला 3000 मीटर स्टीपलचेस राष्ट्रीय विक्रम मोडला आणि गेल्या महिन्यात दोनदा स्वतःचा 100 मीटर राष्ट्रीय विक्रम मोडणारा ज्योती याराजीलाही संघात स्थान मिळालंय.