AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारत ऑस्ट्रेलियाने गाठली अंतिम फेरी, फायनलमध्ये टीम इंडियाशी सामना

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 11 फेब्रुवारीला हा सामना होणार असून कोण जेतेपद पटकवणार याची उत्सुकता आहे

U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारत ऑस्ट्रेलियाने गाठली अंतिम फेरी, फायनलमध्ये टीम इंडियाशी सामना
U19 World Cup : ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत पाकिस्तानला लोळवलं, आता अंतिम फेरीत भारताशी सामना
| Updated on: Feb 08, 2024 | 9:17 PM
Share

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला लोळवलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली. तसेच पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही. अझान अवैस आणि अराफत मिन्हास या जोडीने संघाला 180 धावापर्यंत पोहोचवण्यास मदत केली. अझान अवैसने 91 चेंडूत 52 आणि अराफत मिन्हासने 61 चेंडूत 52 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही खेळाडू तग धरू शकला नाही.त्यामुळे पाकिस्तानने 48.5 षटकात सर्व गडी बाद 179 धावा केल्या आणि विजयासाठी 180 धावांचं आव्हान ठेवलं. ऑस्ट्रेलियाच्या या धावा गाठताना चांगलाच दम निघाला. ऑस्ट्रेलियाने 1 गडी राखून शेवटच्या षटकात पूर्ण केलं. पाकिस्तानने दिलेलं आव्हान गाठताना ऑस्ट्रेलियाचे 4 गडी झटपट बाद झाले. त्यामुळे दडपण आलं होतं. पण हॅरी डिक्सन आणि ओलिवर पीक यांनी डाव सावरला. पण मोक्याच्या क्षणी हॅरी डिक्सन 50 धावा करून  बाद झाल्याने दडपण वाढलं. मिन्हासच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला.

पाकिस्तानने 200 पार धावा केल्या असत्या तर कदाचित ऑस्ट्रेलियाचा विजय कठीण झाला असता. 80 धावा आवश्यक असताना ओलिवर पीक कडवी झुंज दिली. पाच गडी बाद झाले असताना खेळपट्टीवर शेवटपर्यंत तग धरून राहिला. तसेच विजयाचा मार्ग सोपा केला. पण तो बाद झाल्यानंतर कधी सामना पाकिस्तानच्या पारड्यात, तर कधी ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात अशी स्थिती होती. अखेर ऑस्ट्रेलियाने 1 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला.

आता अंतिम फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. 11 फेब्रुवारीला अंतिम फेरीचा सामना होणार आहे. भारताने नवव्यांदा, तर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर

पाकिस्तान U19 (प्लेइंग इलेव्हन): शमिल हुसैन, शाहजेब खान, अझान अवेस, साद बेग (कर्णधार/विकेटकीपर), अहमद हसन, हारून अर्शद, अराफत मिन्हास, नावेद अहमद खान, उबेद शाह, मोहम्मद झीशान, अली रझा

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.