AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

USA vs IRE Live Streaming: यूएसए विरुद्ध आयर्लंड निर्णायक सामना, कोण जिंकणार?

United States vs Ireland T20 World Cup 2024 Live Match Score: यूनायटेड स्टेटसला आयर्लंड विरुद्ध विजय मिळवून सुपर 8 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर आयर्लंड पराभवाच्या हॅट्रिकपासून बचावासाठी मैदानात उतरणार आहे.

USA vs IRE Live Streaming: यूएसए विरुद्ध आयर्लंड निर्णायक सामना, कोण जिंकणार?
usa vs ire
| Updated on: Jun 14, 2024 | 12:15 AM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 30 व्या सामन्यात ए ग्रुपमधील यूनायटेड स्टेटस विरुद्ध आयर्लंड आमनेसामने असणआर आहेत. मोनांक पटेल याच्याकडे यूएसएचं नेतृत्व आहे. तर पॉल स्टर्लिंग आयर्लंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. यूएसएचा हा चौथा आणि आयर्लंडचा तिसरा सामना असणार आहे. यूएसए 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडला अद्याप विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही. यूएसएला हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये पोहचण्याची संधी आहे. तर आयर्लंड पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. अशात हा सामना निर्णायक ठरणार आहे.  तसेच या सामन्याच्या निकालावर पाकिस्ताचं भवितव्य अवलंबून आहे.  त्यामुळे पाकिस्तानचं या सामन्याच्या निकालाकडे लक्ष असणार आहे.

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना केव्हा?

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना शुक्रवारी 14 जून रोजी होणार आहे.

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना कुठे?

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहे.

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

यूएसए विरुद्ध आयर्लंड सामना मोबाईलवर फुकटात डिज्ने प्लस हॉट्स्टार एपवर पाहता येईल.

आयर्लंड टीम: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग, ​​बेंजामिन व्हाइट, नील रॉक, ग्रॅहम ह्यूम आणि रॉस एडेअर.

युनायटेड स्टेट्स टीम: आरोन जोन्स (कॅप्टन), शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल आणि मिलिंद कुमार.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.