AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीचं ते अधुरं स्वप्न, वडिलांची…पहिल्यांदाच मनातलं गुपित बोलून दाखवलं; तुम्हालाही वाटेल अभिमान!

वैभव सूर्यवंशी यावेळी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना त्याने संघाला अनेकदा विजयापर्यंत नेलं आहे. याच वैभवने आपल्या वडिलांच्या खास स्वप्नाबद्दल सांगितलं आहे.

वैभव सूर्यवंशीचं ते अधुरं स्वप्न, वडिलांची...पहिल्यांदाच मनातलं गुपित बोलून दाखवलं; तुम्हालाही वाटेल अभिमान!
VAIBHAV SURYAWANSHIImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2026 | 5:49 PM
Share

Vaibhav Suryavanshi : यंदाच्या आयपीएलमध्ये तुफानी फलंदाजी करणारा वैभव सूर्यवंशी जगभरात चर्चेत आहे. तो या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करतोय. तो मैदानात आला की चौकार, षटकार यांचा पाऊस पडतोय. दरम्यान, वैभव सूर्यवंशी हा मैदानावर एखाद्या वाघाप्रमाणे आक्रमक भासत असला तरीही मनातून मात्र तो खूपच हळवा आहे. त्याच्या हळव्या मनाची प्रचिती नुकतीच आली आहे. आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी तो झटत असल्याचे त्याने सांगितले आहे.

वडिलांच्या स्वप्नाबद्दल काय सांगितलं?

दुरदर्शनवर वैभव सूर्यवंशीची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत तो क्रिकेट, त्याचे स्वप्न अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलताना दिसतोय. याच आपल्या मुलाखतीत त्याने आपल्या वडिलांच्या एका स्वप्नाबद्दल सांगितलं आहे. माझ्या वडिलांचं ते स्वप्न अजूनही अधुरंच आहे, असं त्याने म्हटलं आहे. सोबतच मी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही त्याने बोलून दाखवले.

त्याच्या वडिलांचे स्वप्न काय आहे?

या मुलाखतीत वैभव सूर्यवंशीने आपल्या वडिलांच्या स्वप्नांबद्दल सांगितलं आहे. “मी माझ्या वडिलांशी एकदा चर्चा करत होतो. त्याेवळी बोलताना बेटा तू फक्त तुझे अर्धेच स्वप्न पूर्ण केले आहेस. आणखी अर्ध स्वप्न अजूनही बाकी आहे. भारतीय क्रिकेट संघाकडून विश्वचषकात तुला खेळायचे आहे. तुला जिंकायचे आहे,” असे माझ्या वडिलांनी मला सांगितल्याचे वैभवने यावेळी सांगितले. तसेच भारतीय संघाकडून खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे मलादेखील भारताची निळी जर्सी घालून भारतासाठी खेळायचे आहे, असे वैभव सूर्यवंशी म्हणाला.

दरम्यान, वैभव सूर्यवंशी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना त्याने मोठी कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेलं आहे. वैभवने आतापर्यंत 6 सामन्यांत फलंदाजी केली. या सहा सामन्यांत त्याने एकूण 246 धावा केल्या. या धावा काढताना त्याने 24 चौकार आणि 20 षटकार लगावले. तो अवघा 15 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्या आक्रमक खेळीचे सगळीकडे कौतुक होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...