AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul वरुन टीम इंडियाच्या दोन मोठ्या खेळाडूंमध्ये पडली फूट

KL Rahul Selection Controversy : या टीममध्ये केएल राहुलला स्थान देण्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलय. केएल राहुल अजिबात फॉर्ममध्ये नाहीय. मागच्या अनेक महिन्यांपासून तो खूप खराब खेळतोय. मात्र तरीही टीम इंडियात तो आपलं स्थान टिकवून आहे.

KL Rahul वरुन टीम इंडियाच्या दोन मोठ्या खेळाडूंमध्ये पडली फूट
अरे रे..! नेटकऱ्यांनी पुरती लाजच काढली राव, केएल राहुल स्वस्तात बाद झाल्याने पुन्हा ट्रोलImage Credit source: PTI
| Updated on: Feb 22, 2023 | 9:32 AM
Share

KL Rahul Selection Controversy : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी आणि वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममध्ये केएल राहुलला स्थान देण्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलय. केएल राहुल अजिबात फॉर्ममध्ये नाहीय. मागच्या अनेक महिन्यांपासून तो खूप खराब खेळतोय. मात्र तरीही टीम इंडियात तो आपलं स्थान टिकवून आहे. अन्य खेळाडूंना खराब प्रदर्शनाच कारण देऊन बाहेर बसवलं जातं. मग केएल राहुलला हाच नियम का लागू होत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना पडलाय. याच मुद्यावरुन टीम इंडियाच्या दोन माजी खेळाडूंमध्ये फूट पडली आहे.

दोघांमधील तणाव आता वेगळ्या वळणावर

वेंकटेशन प्रसाद केएल राहुलच्या टीममधील निवडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत. त्याचवेळी दुसरा माजी खेळाडू आकाश चोपडा केएल राहुलच समर्थन करतोय. यावरुन या दोन माजी खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला आहे. दोघांमधील तणाव आता वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलाय.

टि्वटस चर्चेचा विषय बनतायत

वेंकटेश प्रसाद यांनी सोशल मीडियावर केएल राहुल विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांचे टि्वटस चर्चेचा विषय बनतायत. त्याचवेळी आकाश चोपडा केएल राहुलच समर्थन करतायत. आकाश चोपडा आणि वेंकटेश प्रसादमध्ये सुरु झालेल्या या वादाने आता टोक गाठलय.

टि्वटमध्ये काय म्हटलेलं?

आकाश चोपडा यांनी टि्वटरवरुन वेंकटेश प्रसाद यांना चर्चेसाठी आपल्या युट्यूब चॅनलवर बोलावलं. विचारांमध्ये मतभेद स्वाभाविक आहेत. आपण यावर LIVE चर्चा करु शकतो, असं आकाश चोपडा यांनी टि्वटमध्ये म्हटलं होतं.

ऑफर धुडकावताना वेंकटेश प्रसाद काय म्हणाले?

आकाश चोपडा यांच्या या ऑफरवर वेंकटेश प्रसाद यांची रिएक्शन आली आहे. त्यातून हा वाद एका नव्या वळणावर जाताना दिसतोय. वेंकटेश प्रसाद यांनी सर्वप्रथम आकाश चोपडा यांची ऑफर धुडकावली. टि्वटच्या शेवटच्या ओळीत प्रसाद यांनी, आता या विषयावर मला तुझ्याशी बोलायचच नाही, असं लिहिलं. त्या व्हिडिओ बकवास ठरवलं

मला बोलायचच नाही, हा स्टँड वेंकटेश प्रसाद यांनी कधी घेतला. त्याची सुरुवात आकाश चोपडाच्या एका व्हिडिओपासून झाली. चोपडा यांनी केएल राहुलला सपोर्ट करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओत त्यांनी सेना देशांविरुद्ध राहुलच्या कामगिरीचे आकडे दिले होते. वेंकटेश प्रसाद यांनी आकाश चोपडाच्या त्या व्हिडिओ बकवास ठरवलं व नाराज झाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.